शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
3
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
4
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
5
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
6
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
7
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
8
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
9
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
10
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
11
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
12
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
13
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
14
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
15
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
16
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
17
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
18
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
19
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
20
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या

पंतप्रधान मोदींची अंदमान-निकोबारला मोठी गिफ्ट, 3 द्वीपांचं केलं नामकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 7:33 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अंदमान-निकोबार या द्वीपसमूहांच्या दौऱ्यावर आहेत.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी आज अंदमान-निकोबार या द्वीपसमूहांच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी हॅवलॉक द्वीप, नील द्वीप आणि रॉस द्वीपचं नाव बदलण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हॅवलॉक द्वीपचं नामकरणं स्वराज द्वीप असं केलं

पोर्ट ब्लेअर- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अंदमान-निकोबार या द्वीपसमूहांच्या दौऱ्यावर आहेत. अंदमान-निकोबारमध्ये पोहोचल्यानंतर मोदींनी 2004च्या सुनामीत जीव गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी अंदमान-निकोबारमधली जेलही पाहिली. त्यानंतर मोदींनी पोर्ट ब्लेअरमध्ये एका रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी हॅवलॉक द्वीप, नील द्वीप आणि रॉस द्वीपचं नाव बदलण्याची घोषणा केली. तसेच अंदमान-निकोबारला डीम्ड युनिव्हर्सिटीचं गिफ्ट दिलं.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हॅवलॉक द्वीपचं नामकरणं स्वराज द्वीप असं केलं आहे. नील द्वीप आता शहीद द्वीप म्हणून ओळखलं जाणार आहे. तर रॉस द्वीपचं नाव नेताजी सुभाषचंद्र द्वीप असं केलं. जेव्हा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी शहीद झालेल्या स्वातंत्र्यसेनानींची आठवण येते, तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव गौरव आणि सन्मानानं घेतलं जातं. आझाद हिंद सरकारचे पहिले पंतप्रधान सुभाष बाबूंनी अंदमानच्या धरतीवरून भारताच्या स्वातंत्र्याचं रणशिंग फुंकलं. आझाद हिंद सेनेनं इथे तिरंगा फडकावला. मोदी म्हणाले, 30 डिसेंबर 1943च्या त्या ऐतिहासिक घटनेला आज 75 वर्षं पूर्ण झाली आहे. यावेळी मोदींनी 150 फूट उंच झेंड्याचं ध्वजारोहण केलं.ब्रिटिशांच्या गुलामीत असतानाही भारतातील एकता कायम होती. प्राचीन काळापासून भारतवासीय एकत्र असल्याचंही सुभाष बाबू बोलायचे, गुलामीच्या दरम्यान ही एकता भंग करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, परंतु ते त्यांना शक्य झालं नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना देशाला एकसंध केल्यास लोकांची मानसिकता बदलेल.नेताजींच्या पावलावर पाऊल ठेवत आज 130 कोटी भारतीय एक भारत, श्रेष्ठ भारत बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, याचा मला आनंद असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे. इतिहास हा पुरुषार्थ, शौर्य आणि वेदनेचा परिपाक आहे. इतिहासातूनही पुरुषार्थाला पराक्रमाची प्रेरणा मिळते. इतिहास आपल्या परिश्रमाचं प्रतिबिंब आहे. इतिहास आपल्याला सतर्क करतो, तसेच इतिहास आपल्याला सावधानता बाळगण्यासही शिकवतो.इथल्या पाणी आणि विजेची समस्या सोडवण्यासाठीच आम्ही निरनिराळे प्रकल्पांचं उद्घाटन केलं आहे. येत्या 20 वर्षांत पाण्याची समस्या कायमची सुटावी यासाठी धानिकारी धरणांची उंची वाढवली जात आहे. तसेच 6 महिन्यात इथे 7 मेगावॉट सोलर पावर प्लांट्सला मंजुरी दिली आहे, असंही मोदी म्हणाले आहे. तसेच लहानगे, तरुण, वृद्ध आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं मोदींनी सांगितलं आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी