शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

...तर स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोडला असता स्वत:चा विक्रम; फक्त 1 मिनिट होते दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 5:18 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त स्वातंत्र्य दिनी इतर कोणत्याही पंतप्रधानांचे भाषण इतके लांब झाले नाही

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवळपास 93 मिनिटांचे भाषण केले. नरेंद्र मोदींचे हे आत्तापर्यंतचं दुसरं मोठं भाषण आहे. याआधी 2016 मध्ये नरेंद्र मोदींनी 94 मिनिटांचे भाषण केले होते. जे सर्वात जास्त वेळ दिलेलं भाषण आहे. 

यापूर्वी 2018 मध्ये मोदींनी 82 मिनिटं भाषण केले. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले चौथं मोठं भाषण होतं. 2018 मध्ये ध्वजारोहण केल्यानंतर 7 वाजून 33 मिनिटांनी नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करण्यास सुरुवात केली. तर 8 वाजून 55 मिनिटांनी त्यांचे भाषण संपले. 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाला सर्वात लहान भाषण केले. या भाषणाचा वेळ 56 मिनिटं होता. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून 15 ऑगस्ट 2014 रोजी लाल किल्ल्यावरुन देशाला पहिल्यांदा संबोधित केलं. त्यावेळी त्यांच्या भाषणाचा कालावधी 65 मिनिटे होता. त्यानंतर 2015 रोजी नरेंद्र मोदींनी 88 मिनिटे भाषण केले. त्यानंतर 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी 94 मिनिटे भाषण केले. ते आजपर्यंत केलेले सर्वात मोठे भाषण आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त स्वातंत्र्य दिनी इतर कोणत्याही पंतप्रधानांचे भाषण इतके लांब झाले नाही. नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त 50 मिनिटे भाषण केले. मनमोहन सिंग यांनी 2005 आणि 2006 मध्ये सर्वात लांब भाषण केले. तर स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला 35-40 मिनिटे त्यांनी भाषण केले होते. 

2004 मध्ये मनमोहन सिंग पहिल्यांदा पंतप्रधान बनले त्यावेळी त्यांनी 45 मिनिटे भाषण केले होते. तर 2012 मध्ये मनमोहन सिंग यांनी सर्वात कमी वेळ भाषण केले. त्यांच्या भाषणाचा कालावधी 32 मिनिटे होता. तर 2013 मध्ये मनमोहन सिंग यांनी 35 मिनिटे भाषण केले. आपल्या भाषणामुळे प्रसिद्ध असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कधीही स्वातंत्र्य दिनावेळी लांबलचक भाषण केले नाही. वाजपेयींनी 2002 मध्ये 25 मिनिटे भाषण केले. तर 2003 मध्ये 30 मिनिटे भाषण केलं होतं. 

  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिनAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी