Video: पंतप्रधान मोदी विना मास्क पोहोचले कार्यक्रमात; 'आप'ने साधला निशाणा
By मोरेश्वर येरम | Updated: December 17, 2020 15:15 IST2020-12-17T15:11:42+5:302020-12-17T15:15:00+5:30
'आप'ने पंतप्रधान मोदींचा हा व्हिडिओ ट्विट केला. "मास्क वापरा, मोदींसारखं वागू नका", असं कॅप्शन लिहून जनतेला आवाहन करणारं ट्विट करत 'आप'ने मोदींवर निशाणा साधला आहे.

Video: पंतप्रधान मोदी विना मास्क पोहोचले कार्यक्रमात; 'आप'ने साधला निशाणा
नवी दिल्ली
आम आदमी पक्षाने (आप) त्यांच्या अधिकृत ट्विट हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी मास्क न घालता कार्यक्रमात पोहोचल्याचं दिसत आहे. इतकचं नव्हे, तर एका दुकानादारानं त्यांना मास्क देऊ केला असता त्यांनी तो नाकारल्याचंही पाहायला मिळत आहे.
'आप'ने पंतप्रधान मोदींचा हा व्हिडिओ ट्विट केला. "मास्क वापरा, मोदींसारखं वागू नका", असं कॅप्शन लिहून जनतेला आवाहन करणारं ट्विट करत 'आप'ने मोदींवर निशाणा साधला आहे.
Wear a mask. Don't be like Modi ji. pic.twitter.com/lPxdTEdZiI
— AAP (@AamAadmiParty) December 17, 2020
सोशल मीडियावर मोदींचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. जनतेला मास्क वापरण्याचं आवाहन करणारेच मास्क वापरत नाहीत, अशी टीका नेटिझन्सकडून होत आहे.