प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

By Admin | Updated: May 8, 2015 22:46 IST2015-05-08T22:46:10+5:302015-05-08T22:46:10+5:30

Prime Minister Jyoti Jyoti Insurance Scheme | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

> प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना : एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही आयुविर्मा योजना आहे. या योजनेचे दरवर्षी नूतनीकरण आवश्यक आहे. बँका व भारतीय आयुविर्मा महामंडळ यांच्या सहयोगाने या योजना चालविण्यात येणार आहे. १८ ते ५० वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असल्यास कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा काढता येणार आहे. योजनेचा कालावधी
दर वर्षी १ जून ते ३१ मे राहणार आहे. विमा हप्ता बँक खात्यात परस्पर नावे टाकला जाणार आहे. पुढील वर्षाच्या नूतनीकरणाचा अर्ज ३१ मे पर्यंत देणे आवश्यक राहील. योजनेत सहभागी होण्यासाठीचा काळ सरकार सुरुवातीला ३ महिने पर्यंत (३०.११.२०१५) वाढवू शकेल.
विमाधारकाचा कुठल्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास २ लाख रूपयेभरपाई मिळणार आहे.या योजनेचा विमा हप्ता ३३० रूपयेप्रती व्यक्ति, प्रती वर्ष राहणार आहे. विमा धारकाने वय ५५ वर्षे पूर्ण केल्यानंतर बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नावे टाकण्यास पुरेशी शिल्लक नसल्यास बँक खाते बंद करून विमा संरक्षण संपुष्टात येणार आहे.काही अटींची पूतर्ता केल्यानंतर विमा पॉलिसी पुन्हा चालू करता येणार आहे.

Web Title: Prime Minister Jyoti Jyoti Insurance Scheme