नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे जबदस्त एअर स्ट्राइक करून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला होता. मात्र या कारवाईनंतर आता देशात राजकारणाला सुरुवात झाली आहे. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करण्याची गरज होती त्याचवेळी मोदी हे भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. देशाला मजबूत करण्याची वेळ आलेली असताना मोदी मात्र बूथ मजबूत करण्यात व्यस्त आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे.काँग्रेस प्रवक्ते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ''पक्षा पेक्षा देश मोठा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणांमधून वारंवार सांगत असतात. मात्र प्रत्यक्षात त्यांची वर्तणूक ही पक्ष देशापेक्षा मोठा असल्यासारखी आहे. सध्या देशातील वातावरण हे राजकारणापेक्षा देशभक्तीमय झालेले आहे अशावेळी देशाला संबोधित करण्यापेक्षा बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधणे मोदींना का गरजेचे वाटले, हा एक प्रश्नच आहे.'' असे मनीष तिवारी म्हणाले. तसेच ज्या दिवशी भारतीय हवाई दलाने दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केले त्याच दिवशी भाजपा अध्यक्ष पंतप्रधानांसाठी मते मागत होते, ही वेळ काय राजकारण करण्याची आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली.
नरेंद्र मोदी देशाला मजबूत करण्याऐवजी बूथ मजबूत करण्यात व्यस्त, काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 18:39 IST
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे जबदस्त एअर स्ट्राइक करून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला होता. मात्र या कारवाईनंतर आता देशात राजकारणाला सुरुवात झाली आहे.
नरेंद्र मोदी देशाला मजबूत करण्याऐवजी बूथ मजबूत करण्यात व्यस्त, काँग्रेसचा आरोप
ठळक मुद्देहवाई दलाच्या कारवाईनंतर आता देशात राजकारणाला सुरुवातदेशाला मजबूत करण्याची वेळ आलेली असताना मोदी मात्र बूथ मजबूत करण्यात व्यस्त आहेत, असा आरोप काँग्रेसने केला