शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव अपघाताची पंतप्रधानांकडूनही दखल, मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 16:52 IST

PM Modi Condoles Loss Of Lives In Jalgaon Road Accident : जळगावमधील मजुरांच्या अपघाताची घटना वेदनादायक असून पीडित कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो, आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय.

ठळक मुद्देजळगावमधील मजुरांच्या अपघाताची घटना वेदनादायक असून पीडित कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो, आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय.

जळगाव - तालुक्यातील अभोडा, केर्‍हाळे, विवरे, रावेर येथील हातावर पोट असलेले मजूर बायका पोरांसह धुळे जिल्ह्यातील शहादा तालूक्यात पपई भरून आणण्याच्या हातमजुरीसाठी नेहमीप्रमाणे जात असताना भीषण अपघात झाला. या अपघातात एक दाम्पत्य, तीन कुटूंबातील मायलेकी व मायलेकांसह ११ जण अभोडा येथील, दोन रावेर तर केर्‍हाळे व विवरे येथील एकेक जण असे एकूण १५ जण पपईने भरलेला ट्रक किनगावनजीक पलटल्याने आज पहाटे जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सर्वत्र हाहाकार उडवणाऱ्या या घटनेने अभोडा, विवरे, केर्‍हाळे व रावेर शहरासह तालूक्यात एकच शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी  Uddhav Thackeray या घटनेची दखल घेत, मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना मदत जाहीर केलीय.  ( PM Modi Condoles Loss Of Lives In Jalgaon Road Accident )

जळगावमधील मजुरांच्या अपघाताची घटना वेदनादायक असून पीडित कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो, आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Narendra Modi म्हटलंय. तसेच, या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी दोन लाखांची मदत, पंतप्रधान सहायता निधीमधून जाहीर करण्यात आली आहे. तर, गंभीर जखमींना 50 हजारांची मदतही देण्याचं पीएमओ कार्यालयाने सांगितलंय. 

मुख्यमंत्र्यांकडूनही मदत जाहीर 

मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करुन मृतांच्या वारसांना सरकारकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जखमींवरील उपचाराचा खर्चही शासन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली असून संबंधित अपघातग्रस्तांना सर्व ती आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. 

धुळे जिल्ह्यातील शहादा येथे  पपई भरून आणण्याच्या हातमजूरीसाठी गेलेल्या तालुक्यातील हे मजूर रविवारी ट्रकमध्ये पपई भरून रावेरला आणत असताना क्रूर नियतीने झडप घालून यावल तालुक्यातील किनगावजवळ बऱ्हाणपूर - अंकलेश्वर राज्य महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने अभोडा येथील एकाच आप्तपरिवारातील ११ जणांवर झडप घातल्याने अभोडा गावावर शोककळा पसरली.

मृतांची नावे

मृतांमध्ये अशोक जगन वाघ (वय ४०), संगिता अशोक वाघ (वय २५) या दाम्पत्यासह त्यांची  लहानगा मुलगा सागर अशोक वाघ (वय ०३ वर्षे)व  नरेंद्र वामन वाघ (वय २५) हे एकाच परिवारातील चार सदस्य कमलाबाई रमेश मोरे (वय ४५) यांची शारदा रमेश मोरे (वय १५) व गणेश रमेश मोरे (वय ०५) वर्षे ही दोन्ही मुल मुली , संदीप युवराज भालेराव (वय २५) व दुर्गाबाई संदीप भालेराव (वय २०) हे दाम्पत्य, सबनूर हूसेन तडवी (वय ५३) व दिलदार हुसेन तडवी (वय २०) हे मायलेकांसह  रावेर येथील शेख हुसेन शेख मण्यार फकीरवाडा रावेर, डिगंबर माधव सपकाळे वय ५५ रावेर, केर्‍हाळे येथील सर्फराज कासम तडवी वय ३२ व संदीप युवराज भालेराव विवरे अशी १५ जण जागीच ठार झाल्याने एकच शोककळा पसरली असून, अभोडावासीयांची साखरझोपेतील झोप उडाली असून मुखशुद्धीसह चहापाणीसाठी आज पहाटे गावात एकही चूल पेटली नाही.

उपमुख्यमंत्र्यांनीही व्यक्त केला शोक

जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील किनगाव हद्दीत पपई घेऊन जाणाऱा टेम्पो उलटून पंधरा मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटेनेतील मृत बांधवांना श्रद्धांजली वाहिली. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी सहसंवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींची प्रकृती लवकर सुधारावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. अपघातस्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य करणाऱ्या ग्रामस्थ, पोलिस, मदत पथकाचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावNarendra Modiनरेंद्र मोदीAccidentअपघात