Delhi Corona RT-PCR Test Price: दिल्ली सरकारचा मोठा निर्णय! कोरोना चाचणी झाली स्वस्त; RT-PCR अवघ्या ३०० रुपयांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 19:34 IST2022-01-20T19:34:02+5:302022-01-20T19:34:48+5:30

Delhi Corona RT-PCR Test Price: राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना केजरीवाल सरकारनं सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.

price of rt pcr test reduced in delhi now only rs 300 hav to be paid | Delhi Corona RT-PCR Test Price: दिल्ली सरकारचा मोठा निर्णय! कोरोना चाचणी झाली स्वस्त; RT-PCR अवघ्या ३०० रुपयांत

Delhi Corona RT-PCR Test Price: दिल्ली सरकारचा मोठा निर्णय! कोरोना चाचणी झाली स्वस्त; RT-PCR अवघ्या ३०० रुपयांत

Delhi Corona RT-PCR Test Price: राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना केजरीवाल सरकारनं सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना चाचणीच्या दरात मोठी कपात करण्याचा निर्णय दिल्ली सरकारनं आज जाहीर केला आहे. दिल्लीत आथा सर्व रुग्णालय आणि पॅथोलॉजी लॅबमध्ये RT-PCR चाचणी याआधीपेक्षा स्वस्त आणि रास्त दरात केली जाणार आहे. 

सरकारनं जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार दिल्लीत आता RT-PCR चाचणी करण्यासाठी केवळ ३०० रुपये द्यावे लागणार आहेत. याआधी आरटीपीआर चाचणीसाठी ५०० रुपये द्यावे लागत होते. आता नव्या दरानुसार होम कलेक्शन सॅम्पलसाठी आरटीपीआर चाचणीचे ५०० रुपये द्यावे लागणार आहेत. याआधी याच सेवेसाठी ७०० रुपये आकारले जात होते. इतकंच नव्हे, तर दिल्लीत आता रॅपिड अँटिजन टेस्ट अवघ्या १०० रुपयांमध्ये केली जाणार आहे. 

Web Title: price of rt pcr test reduced in delhi now only rs 300 hav to be paid