शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गांधीनगरमध्ये प्रतिष्ठेची लढाई, केंद्रीय नेते गुजरातमध्ये तळ ठोकून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 10:34 IST

गांधीनगरमधील सात जागांपैकी पाच जागा भाजपकडे तर दोन जागा काँग्रेसकडे आहेत. यावेळी सातही जागा निवडून आणण्याची शहा यांची रणनीती आहे. त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई बनल्याने ते येथे लक्षणीय वेळ देत आहेत.

अहमदाबाद : गुजरात निवडणुकीचे वातावरण तापू लागताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अधिकाधिक वेळ आपल्या गृहराज्यात व्यतित करू लागले आहेत. भाजपच्या निवडणूक रणनीतीचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे. उमेदवारांची नावे अंतिम करणे, बंडखोरांना चुचकारणे यासह विविध आघाड्यांवर ते काम करत आहेत. गेले चार दिवस ते राज्यात तळ ठोकून असले तरी त्यांचा बहुतांश वेळ अहमदाबाद व गांधीनगरसाठी खर्ची झाला. गांधीनगर हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. तेथून पक्षाला अधिकाधिक यश मिळवून देण्यासाठी त्यांनी जोर लावला आहे. 

या जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांना पक्षाने तिकिटे नाकारली. दगाफटका होऊ नये म्हणून या मतदारसंघात शहा यांनी रात्री उशिरा बैठका घेतल्या. गांधीनगरमधील सात जागांपैकी पाच जागा भाजपकडे तर दोन जागा काँग्रेसकडे आहेत. यावेळी सातही जागा निवडून आणण्याची शहा यांची रणनीती आहे. त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई बनल्याने ते येथे लक्षणीय वेळ देत आहेत.

अमरेलीत भाजप लावणार जोरपाटीदारबहुल अमरेली जिल्हा एकेकाळी भाजपचा गड होता. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसने येथे भाजपची धूळधाण केली होती. भाजपला पाचपैकी एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. यावेळी भाजप जिल्ह्यातील काही जागा जिंकून आपली प्रतिष्ठा वाचविण्याचा प्रयत्न करेल. २०१७ च्या निवडणुकीत पाटीदारबहुल अमरेली जिल्ह्यात भाजपला मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस केवळ तीन जागा लढवणार- गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेससोबत युती केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस तेथे अवघ्या ३ जागा लढविणार आहे. - २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये ५८ जागा लढविल्या होत्या तेव्हा पक्षाची काँग्रेससोबत आघाडी नव्हती. - केवळ एकाच ठिकाणी पोरबंदर येथून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. - राकाँने नरोडात काँग्रेसच्या नगरसेवकाला तिकीट दिले होते. मात्र, त्याने निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे  पक्ष दुसरा उमेदवार उभा करणार आहे.

काँग्रेसच्या काळात अयोध्येत राम मंदिराची उभारणी किंवा कलम ३७० हटविणे शक्य झाले असते का ? - योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, यूपी 

 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Amit Shahअमित शाहElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस