राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी
By Admin | Updated: September 2, 2015 23:31 IST2015-09-02T23:31:49+5:302015-09-02T23:31:49+5:30
प्रशासन कामाला लागले: अधिकारी व कर्मचारी दौऱ्यावर

राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी
प रशासन कामाला लागले: अधिकारी व कर्मचारी दौऱ्यावरनागपूर : महापालिकेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव निमित्ताने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी १४ सप्टेंबरला दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यांवर येत आहे. दुसऱ्या दिवशी व्हीएनआयटी चा दीक्षांत समारंभ आहे. समारंभ अविस्मरणीय व्हावा, यासाठी मनपा प्रशासन कार्यक्रमाच्या जय्यत तयारीला लागले आहे. विमानतळ ते राजभवन तसेच कार्यक्रमाकडे जाणाऱ्या मार्गाची दुरुस्ती करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी यापूर्वीच दिले आहे. विमानतळ, वर्धा मार्ग, मानकापूर क्र्रीडा संकुल, आदी ठिकाणी हिरवळ निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या दृष्टीने मनपा प्रशासन कामाला लागले आहे. महापौर प्रवीण दटके यांच्या निर्देशानुसार नगररचना समितीचे सभापती सुनील अग्रवाल, उपायुक्त संजय काकडे, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांच्या मार्गदर्शनात अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी विमानतळ,व्हीएनआयटी, राजभवन, मानकापूर क्रीडा संकुल आदी ठिकाणी पाहणी केली. कार्यक्रमाच्या दृष्टीने तयारी करण्याचे निर्देश दिले. नगरसेवक देवेंद्र मेहर, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)चौकट...डासांना आळा घालण्यासाठी फॉगिंगराजभवन परिसर, मानकापूर क्रीडा संकूल परिसराची स्वच्छता ठेवण्यासोबतच डासांना आळा घालण्यासाठी फॉगिंग करण्याचे निर्र्देश देण्यात आले आहे. त्यानुसार कार्यक्रमापूर्वी या परिसरात दररोज फॉगिंग केली जाणार आहे.