मुसळधार पावसात उभे राहून राष्ट्रपतींनी स्वीकारली सलामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 16:24 IST2017-10-09T16:20:39+5:302017-10-09T16:24:53+5:30
राष्ट्रगीताला उभे राहावे की न राहावे यावरून आपल्याकडे वाद रंगत असतात. मात्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रगीताच्या सन्मान करा राखावा याचा आदर्श समोर ठेवला आहे.

मुसळधार पावसात उभे राहून राष्ट्रपतींनी स्वीकारली सलामी
त्रिवेंद्रम - राष्ट्रगीताला उभे राहावे की न राहावे यावरून आपल्याकडे वाद रंगत असतात. मात्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रगीताच्या सन्मान करा राखावा याचा आदर्श समोर ठेवला आहे. केरळ दौऱ्यावर गेलेल्या राष्ट्रपतींना सेनादलाकडून सलामी देण्यात येत होती. त्यावेळी राष्ट्रगीताची धून वाजत होती. मात्र अचानक पावसाला सुरुवात झाली. मात्र राष्ट्रपती राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ छत्रीचा वापर न करता भर पावसात उभे राहिले.
राष्ट्रपतीपद स्वीकारल्यानंतरचा राष्ट्रपतींचा हा पहिलाच केरळ दौरा होता. माता अमृतानंदमयी यांच्या मठात आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी सैन्याकडून सलामी देत असताना हा प्रसंग घडला. त्यावेळी मुसळधार पावसाची सर आली. तेथे उपस्थित असलेल्या लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींसाठी छत्री उघडली. मात्र राष्ट्रपतींनी त्यास नकार देत राष्ट्रगीत संपेपर्यंत तसेच उभे राहणे पसंत केले.
त्यानंतर केरळमधील वल्लीक्कावूजवळ असलेल्या माता अमृतानंदमयी मठाच्या मुख्यालयात राष्ट्रपतींना मठाच्या कार्याचे कौतुक केले. तसेच विविध धर्मांना एकतेच्या धाग्यात ओवणाऱ्या केरळच्या सांस्कृतिक वारशाचेही राष्ट्रपतींनी कौतुक केले.