भारताचा शांततेवर विश्वास; परंतु दुस्साहसाला उत्तर देण्यास सक्षम- राष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 06:11 AM2020-08-15T06:11:18+5:302020-08-15T06:46:25+5:30

७४व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पूर्व लडाखमध्ये बलिदान दिलेल्या जवानांना आदरांजली वाहिली.

president Ramnath Kovind Address To Nation On Eve Of Independence Day 2020 | भारताचा शांततेवर विश्वास; परंतु दुस्साहसाला उत्तर देण्यास सक्षम- राष्ट्रपती

भारताचा शांततेवर विश्वास; परंतु दुस्साहसाला उत्तर देण्यास सक्षम- राष्ट्रपती

googlenewsNext

नवी दिल्ली : भारताच्या सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी चीनला अप्रत्यक्षरीत्या संदेश देताना म्हटले आहे की, भारताचा शांततेवर विश्वास आहे. परंतु कोणी दुस्साहस करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सडेतोड उत्तर देण्यास भारत सक्षम आहे. कोरोनाशी लढण्यासाठी जागतिक समुदायाने एकजूट होऊन लढण्याची गरज असताना शेजारी देशांनी त्यांच्या कारवाया चालूच ठेवल्या. ७४व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पूर्व लडाखमध्ये बलिदान दिलेल्या जवानांना आदरांजली वाहिली.

सुपर ह्युमन कामगिरीची प्रशंसा
जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना महामारीशी लढण्यात भारताने बजावलेल्या सुपर ह्युमन कामगिरीची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली असून, याचे जगाने अनुकरण करण्यायोग्य ही कृती आहे, असे म्हटले आहे. त्यांनी कोरोना योद्ध्यांचे कौतुक केले आहे. डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी हे या लढाईत सर्वात पुढे राहिलेले आहेत. ते आमचे राष्ट्रीय नायक आहेत, असेही म्हटले आहे.

Web Title: president Ramnath Kovind Address To Nation On Eve Of Independence Day 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.