शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात भाजपची जबरदस्त खेळी, अरविंद केजरीवालांची झाली कोंडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 20:37 IST

दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार असलेली आम आदमी पार्टी देखील याच दुविधेत सापडली आहे. आतापर्यंत उमेदवारांची नावे जाहीर होण्याची वाट पाहणाऱ्या या पक्षाने, आता म्हटले आहे, की पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. तर विरोधी पक्षांनी भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांचे नाव या निवडणुकीसाठी जाहीर केले आहे. उमेदवार जाहीर झाल्यानंतर एकीकडे सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांनी आपापली गणिते बळकट करायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे काही पक्ष असेही आहेत, ज्यांनी अद्याप पर्यंत एनडीएच्या उमेदवाराला मतदान करायचे, की विरोधकांना बळकटी द्यायची याचा निर्णय घेतलेला नाही.

दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार असलेली आम आदमी पार्टी देखील याच दुविधेत सापडली आहे. आतापर्यंत उमेदवारांची नावे जाहीर होण्याची वाट पाहणाऱ्या या पक्षाने, आता म्हटले आहे, की पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

विरोधकांकडून करण्यात आलेल्या सिन्हा यांच्या नवासंदर्भात बोलताना आपचे राज्यसभा खासदार संजयसिंह पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले, "जेव्हा पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात निर्णय घेतील तेव्हा आपल्याला सांगितले जाईल." पुन्हा विचारले असता ते म्हणाले, "अंतिम निर्णय पक्षाचे शीर्ष नेतृत्वच घेईल, एवढेच यावेळी सांगू शकतो,'' असे ते म्हणाले.

भाजपच्या खेळीत आपची गोची? -नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचा राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. भाजपविरुद्धच्या लढाईत आप स्वतःला काँग्रेसचा पर्याय म्हणून प्रेझेंट करताना दिसत आहे. अशा स्थितीत पक्ष विरोधी उमेदवाराला पाठिंबा देईल, असे मानले जात होते. मात्र भाजपच्या आदिवासी खेळीने 'आप'ची कोंडी केली आहे. अलिकडच्या काळात केजरीवाल स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणूनही प्रेझेंट करत आहे. अर्था आता द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठ फिरवणे त्यांच्यासाठी सोपे नाही.

१८ जुलै रोजी राष्ट्रपदीपदासाठी निवडणूक होणार -विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. देशाच्या पुढील राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य आणि दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेशांसह सर्व राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य असलेल्या इलेक्टोरल सदस्यांद्वारे राष्ट्रपतीची निवड केली जाते. सुमारे १०.८६ लाख मतांच्या इलेक्टोरल मंडळात भाजपच्या नेतृत्वाखालील युतीला ४८ टक्क्यांहून अधिक मते असल्याचा अंदाज आहे आणि काही प्रादेशिक पक्षांचाही त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपा