मनपा शिक्षण समितीचे स्वतंत्र अंदाजपत्रक सादर

By Admin | Updated: August 26, 2015 00:18 IST2015-08-26T00:18:57+5:302015-08-26T00:18:57+5:30

नाशिक : महापालिकेच्या महासभेत प्रथमच शिक्षण समितीचे सभापती संजय चव्हाण यांनी शिक्षण समितीचे स्वतंत्र अंदाजपत्रक सादर करत मनपा शाळांचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध सूचना मांडल्या.

Presenting Independent Budget of Municipal Education Committee | मनपा शिक्षण समितीचे स्वतंत्र अंदाजपत्रक सादर

मनपा शिक्षण समितीचे स्वतंत्र अंदाजपत्रक सादर

शिक : महापालिकेच्या महासभेत प्रथमच शिक्षण समितीचे सभापती संजय चव्हाण यांनी शिक्षण समितीचे स्वतंत्र अंदाजपत्रक सादर करत मनपा शाळांचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध सूचना मांडल्या.
महासभेत शिक्षण समितीचेही अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यावेळी संजय चव्हाण यांनी महापालिकेने सुचविलेल्या अंदाजपत्रकात २१.९२ कोटी रुपयांची वाढ सुचवित ८३ कोटी ५५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. यावेळी संजय चव्हाण यांनी महापालिका शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करणे, डिजीटल शाळा करणे, स्वयंसेवी संस्थांना काही शाळा दत्तक देणे, विद्यार्थ्यांसाठी योग वर्ग सुरू करणे यासारखे प्रकल्प राबवितानाच विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग व सॉक्स-शूज, शैक्षणिक व क्रीडा साहित्य, शिक्षक गौरव समारंभ, गरीब विद्यार्थ्यांना व‘ा, पाट्या पुरविणे, राज ठाकरे यांच्या नावाने आंतरशालेय क्रीडा स्पर्धा, अटल वक्तृत्व स्पर्धा, शरद महोत्सव, मॉँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या नावाने आरोग्य तपासणी शिबिरे, ममता दिनी विद्यार्थी सहाय्यता निधी, नातेपाक उर्दू वक्तृत्व स्पर्धा, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावाने स्पर्धा परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहली, संगणक प्रशिक्षण निधी, बालनाट्य महोत्सव, वॉटर प्युरिफायर योजना, शालेय इमारत रंगरंगोटी, विज्ञान प्रदर्शन, विद्यार्थ्यांना सायकल वाटप आदिंसाठी वाढीव तरतूद करण्याचा प्रस्ताव मांडला. यावेळी महापौरांनी समितीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली.

Web Title: Presenting Independent Budget of Municipal Education Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.