पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 09:24 IST2025-09-07T09:23:05+5:302025-09-07T09:24:01+5:30

इम्फाळ/चुराचंदपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १३ सप्टेंबर रोजी मणिपूरला भेट देतील अशी शक्यता आहे. सध्या इम्फाळमधील कांगला किल्ल्यावर ...

Preparations in full swing for Prime Minister's visit to Manipur; Arrangements for a meeting for 15,000 people, stage construction work underway | पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू

पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू

इम्फाळ/चुराचंदपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १३ सप्टेंबर रोजी मणिपूरला भेट देतील अशी शक्यता आहे. सध्या इम्फाळमधील कांगला किल्ल्यावर पंतप्रधानांच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या संभाव्य मणिपूर दौऱ्यासाठी भव्य स्टेज बांधण्यात येत आहे. या परिसरात साफसफाई आणि रंगरंगोटीचे कामही सुरू आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली.

किल्ल्यातील बांधकाम आणि साफसफाईची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, त्यांनी कामाचा उद्देश नमूद केला नाही. याचबरोबर चुराचंदपूर जिल्हा मुख्यालयातील शांती मैदानावरही असेच काम सुरू आहे, असे सांगण्यात आले.

१५००० लोकांची बैठक व्यवस्था

इम्फाळमधील कांगला किल्ला हा माजी मणिपुरी शासकांच्या पारंपरिक सत्तेचे केंद्र राहिला आहे. सध्या कांगला किल्ल्यामध्ये एका भव्य स्टेजचे बांधकाम सुरू आहे. स्टेजसमोर १५,००० हून अधिक लोकांना बसण्याची व्यवस्था केली जात आहे.

इतर ठिकाणीही कामे

इम्फाळ विमानतळ आणि कांगला किल्ल्यामधील सात किमीच्या मार्गावर दुभाजक रंगवणे, झाडांची छाटणी केली जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आम्हाला पंतप्रधानांच्या भेटीबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही, असे भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांनी सांगितले.

Web Title: Preparations in full swing for Prime Minister's visit to Manipur; Arrangements for a meeting for 15,000 people, stage construction work underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.