क्रौर्याचा कळस! आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेचे तुकडे करुन रस्त्यावर फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 12:41 IST2018-01-31T12:33:35+5:302018-01-31T12:41:34+5:30

एका गर्भवती महिलेला मारहाण करुन अत्यंत निदर्यतेने तिची हत्या करण्यात आली. आरोपींनी या गर्भवती महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते दोन पोत्यात भरले.

Pregnant woman chopped into pieces | क्रौर्याचा कळस! आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेचे तुकडे करुन रस्त्यावर फेकले

क्रौर्याचा कळस! आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेचे तुकडे करुन रस्त्यावर फेकले

ठळक मुद्देसफाई कर्मचा-यांनी एक पोते उघडले त्यामध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाचे तुकडे होते. बोटॅनिकल गार्डनजवळच एक कंस्ट्रक्शन साईट सुरु आहे तिथे ही पोती फेकण्यात आली होती. 

हैदराबाद - आंध्रप्रदेशची राजधानी हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस गाठणारी एक घटना समोर आली आहे. एका गर्भवती महिलेला मारहाण करुन अत्यंत निदर्यतेने तिची हत्या करण्यात आली. आरोपींनी या गर्भवती महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते दोन पोत्यात भरले व ती पोती कोंडापूर येथील रस्त्यावर फेकून दिली. हैदराबाद महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांना झाडलोट करताना ही पोती सापडली. पोत्यांमधून दुर्गंधीचा वास येत असल्याने त्यांना संशय आला. त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. 

सफाई कर्मचा-यांनी एक पोते उघडले त्यामध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाचे तुकडे होते. एका पोत्यामध्ये धड होते तर दुस-या पोत्यात मृतदेहाचे वेगवेगळे भाग होते असे सायबराबाद पोलिसांनी सांगितले. मृतदेहाचे भाग व्यवस्थित प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळल्यानंतर ते पोत्यात भरण्यात आले होते. बोटॅनिकल गार्डनजवळच एक कंस्ट्रक्शन साईट सुरु आहे तिथे ही पोती फेकण्यात आली होती. 

महिलेच्या शरीरावरील कपडे, हाता-पायाची बोटे या पोत्यामध्ये होती. ही महिला विवाहित असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. ही महिला आठ महिन्यांची गर्भवती होती तिच्या पोटात मुलगा होता असे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. रविवारी ही हत्या झाल्याची शक्यता आहे. मृत महिलेच्या बरगडयांवर जखमा होत्या. त्यामुळे आरोपीने पोटातील मुलाला संपवण्याच्या हेतूने ही हत्या केल्याचे स्पष्ट होते असे मधापूरचे डीसीपी विश्वा प्रसाद यांनी सांगितले. पोती फेकणा-या माणसाला शोधण्यासाठी पोलीस या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच पोलिसांना मुख्य आरोपींपर्यंत पोहोचवू शकते.                                                                                                                                    

Web Title: Pregnant woman chopped into pieces

टॅग्स :Murderखून