शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

देशभरातून प्रार्थना... 'चंद्रयान ३' च्या यशस्वी लँडिंगसाठी बाबा रामदेवांचा यज्ञ सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 12:34 IST

भारताच्या चंद्रयान ३ च्या शसस्व लँडिंगसाठी अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि युरोपची अंतराळ संस्था इसा इस्त्रोच्या मदतीला धावल्या आहेत.

हरीद्वार - भारतासाठीच नव्हे तर जगासाठी आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. चंद्रयान ३ आज चंद्राच्या काळोख्या बाजुला उतरत आहे, ही जागा जगापासून लपून राहिलेली आहे. भारतासह अन्य देशांनी आजवर पृथ्वीकडील प्रकाशमान भागावरच यान उतरविलेली आहेत. अशातच चंद्रयान २ चे अपयश आणि परवाच रशियाच्या लुना २५ चे अपयश यामुळे सर्वांच्या मनात धाकधुक आहे. त्या पार्श्वभुमीवर शास्त्रज्ञ सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. तर, देशावासीय प्रार्थना करत आहेत. योगगुरु बाबा रामदेव यांनी या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आणि चंद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगसाठी यज्ञ सुरू केले आहे.

भारताच्या चंद्रयान ३ च्या शसस्व लँडिंगसाठी अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि युरोपची अंतराळ संस्था इसा इस्त्रोच्या मदतीला धावल्या आहेत. चंद्रयान -३ आज सायंकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. जेव्हापासून चंद्रयान- अवकाशात झेपावले आहे, तेव्हापासून या दोन्ही एजन्सी भारताला ट्रॅकिंगसाठी मदत करत आहेत. आजही नासा लँडिंगवेळी इस्त्रोला मदत करणार आहे. शास्त्रीय पातळीवर संसोधन संस्थांकडून योग्य ती खबरदारी आणि प्रयत्न सुरू आहेत. तर, देशवासीयांनाही या मोहिमेचं कुतूहल असून कोट्यवधी भारतीयांची प्रार्थना सुरू आहे.  परमार्थ निकेतन येथे विशेष गंगा आरती करण्यात आली आहे. स्वामी चिदानंद सरस्वती, परमार्थ गुरुकुलचे ऋषिकुमार आणि श्रद्धाळूंनी गंगा मातेचा अभिषेक करुन चंद्रयान ३ च्या सुरक्षित लँडिंगसाठी प्रार्थना केली आहे. सर्वांनीच यज्ञात आहुती समर्पित केली. तर, बाबा रामदेव यांनीही यज्ञ सुरू केले आहे. रामदेव यांनी हरीद्वार येथे पूजा आणि यज्ञ सुरु केला आहे. 

भारत जगातील पहिला देश

 चंद्रयान 3 आज इतिहास रचणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने म्हटले आहे की, चंद्रयान-3 मोहीम वेळापत्रकानुसार आहे आणि आज बुधवारी सायंकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर सॉफ्ट लँडिंगसाठी सुरळीतपणे प्रगती करत आहे. चंद्रावर उतरल्यानंतर, भारत असे करणारा जगातील चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनेल. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीनने ऐतिहासिक कामगिरी केली आहे

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाChandrayaan-3चांद्रयान-3Chandrayaan 2चांद्रयान-2Indiaभारतisroइस्रो