शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Physics Wallah Alakh Pandey Success Story: एकेकाळी शिक्षणासाठी वडिलांनी विकलं होतं घर, आज शिक्षक मुलानं उभी केली १.१ बिलियन डॉलर्सची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 13:22 IST

Physics Wallah Alakh Pandey Success Story: फिजिक्सचे शिक्षक अलख पांडे यांना Unacademy वार्षिक ४ कोटी रुपयांची नोकरी ऑफर करण्यात आली होती, पण त्यांनी ती नाकारली. आता त्यांची स्वतःची कंपनी देशातील १०१ व्या युनिकॉर्न कंपन्यांच्या यादीत सामील झाली आहे.

Physics Wallah Alakh Pandey Success Story: अलख पांडे (Alakh Pandey) म्हणजेच फिजिक्स वाला (Physics wallah) हे एक नाव आहे ज्याला प्रत्येकजण ट्रोल करत आहे. याचे कारण म्हणजे त्यांची कंपनी एडटेक फर्म फिजिक्सवाला (Edtech platform PhysicsWallah) आता देशातील युनिकॉर्न कंपन्यांच्या समुहात सामील झाली आहे. युनिकॉर्न म्हणजे एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्यांकन असा आहे.

प्रयागराज येथील रहिवासी अलख पांडे सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. एकेकाळी त्यांचे वडील सतीश पांडे आणि आई रजत पांडे यांना मुलगा अलख आणि मुलगी अदिती यांच्या शिक्षणासाठी घर विकावे लागले. अलख पांडे यांचे सुरुवातीचे शिक्षण प्रयागराज येथील बिशप जॉन्सन शाळेत झाले. त्यांना हायस्कूलमध्ये ९१ टक्के आणि १२ वीत ९३.५ टक्के गुण मिळाले. १२ वी नंतर एका कोचिंग क्लासमध्ये ३ हजार रुपये महिन्यावर त्यांनी शिकवायला सुरुवात केली.

२०१७ मध्ये सुरू केला युट्युब चॅनलअलख पांडे यांनी २०१५ मध्ये आयआयटी कानपूरमधून बीटेकचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर त्याच संस्थेत शिकवायला सुरुवात केली. शिक्षक बनलेले शिक्षक अलख पांडे यांनी आपला सहकारी प्रतीक माहेश्वरी यांच्यासोबत २०१७ मध्ये फिजिक्सवाला नावाचे यूट्यूब चॅनल सुरू केले. यानंतर यूट्यूबवर त्यांनी आपल्या लेक्चर्सचे व्हिडीओ अपलोड करण्यास सुरुवात केली. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना त्यांचे यूट्यूब व्हिडीओ पसंतीस पडू लागले आणि त्यांच्या व्हिडीओंना मिळणारे व्ह्यूजही वाढले.

कोरोनाकाळात अॅप सुरू केलंयानंतर अलख पांडेने सलग ३ वर्षे युट्युबवर अशाच लेक्चरचे व्हिडीओ अपलोड केले. यानंतर, कोरोनाच्या काळात NEET आणि JEE ची तयारी करणाऱ्या मुलांच्या अडचणी लक्षात घेऊन एक मोबाइल अॅप तयार करण्यात आले. ज्यामध्ये अत्यंत कमी शुल्कात ऑनलाइन कोचिंगची सुविधा सुरू करण्यात आली.

६९ लाख सबस्क्रायबर्सया अॅपद्वारे अलख पांडे केमिस्ट्री आणि फिजिक्सच्या कठीण प्रश्नांची उत्तरे अगदी सहज देत असत. लवकरच ते विद्यार्थ्यांमध्येही खूप लोकप्रिय झाले. या गुणवत्तेमुळे फिजिक्सवालाच्या यूट्यूब चॅनेलचे ६९ लाख सबस्क्राइबर्स झाले आणि अॅप्सही ५० लाख जणांनी डाउनलोड केले. २०२० मध्ये फिजिक्सवालाला कंपनी अॅक्टमध्येही सामील करण्यात आलं.

१०१ वी युनिकॉर्न कंपनीप्रतीक माहेश्वरी यांनी आयआयटी बीएचयूमधून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आहे आणि ते अलख पांडे यांच्यासोबत काम करतात. ते संपूर्ण व्यवसाय सांभाळतात. आज या एडटेक कंपनीची नेट वर्थ १.१ बिलियनपर्यंत पोहोचली आहे. तसेच ही कंपनी देशातील १०१ व्या युनिकॉर्न कंपन्यांमध्ये सामील झाली आहे. वेस्टब्रिज आणि GSV व्हेंचर्स यांनी अलख पांडे यांच्या कंपनीत १०० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

४ कोटींची ऑफर नाकारलीUnacademy कडून अलख पांडेंनी वार्षिक ४ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. परंतु त्यांनी ती नाकारली आणि त्यानंतर ते चर्चेतही आले होते. त्याचवेळी त्यांनी आणखी ७.५ कोटींची ऑफरही नाकारली होती. शिक्षक अलख पांडे या यशामागे आपल्या वडिलांसोबतच त्यांचे सहकारी प्रतीक माहेश्वरी यांचे समान योगदान मानतात.

टॅग्स :IndiaभारतEducationशिक्षण