शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
4
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
5
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
7
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
8
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
9
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
10
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
11
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
12
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
13
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
14
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
15
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
16
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
17
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
18
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
19
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
20
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड

“तीन तलाकवर कायदा होऊ शकतो, मग मथुरा आणि काशीसाठीही व्हायला हवा”: प्रवीण तोगडिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 11:38 AM

अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराबाबत प्रवीण तोगडिया यांनी समाधान व्यक्त केले.

जौनपूर: उत्तर प्रदेशमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (UP Election 2022) राजकारण अधिक तापताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया (Pravin Togadia) यांनी जौनपूर येथील शारदा शक्तिपीठाचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना, तीन तलाकसंदर्भात कायदा होऊ शकतो. मग मथुरा आणि काशीच्या संदर्भात कायदा व्हायला हवा, अशी मागणी प्रवीण तोगडिया यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेत आहे. देशात तीन तलाकच्या संदर्भात कायदा मंजूर करण्यात आला. तसाच मथुरा आणि काशीसाठीही कायदा करायला हवा. देश आणि मंदिरे तोडणाऱ्या जिहादींना कठोर शिक्षा व्हायला हवी. त्यांना नेस्तनाभूत करायला हवे, असे परखड मत प्रवीण तोगडिया यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. 

कायदे करून सरकारने काशी विश्वनाथचा सन्मान करावा

केंद्रातील मोदी सरकारने संसदेत  मथुरा आणि काशीसंदर्भात कायदा करून काशी विश्वनाथचा सन्मान करावा. असे केल्यास भाजपला आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत त्याचा फायदा होईल, असा विश्वास तोगडिया यांनी व्यक्त केला. अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराबाबत प्रवीण तोगडिया यांनी समाधान व्यक्त केले. हिंदूंच्या मोठ्या संघर्षानंतर राम मंदिर आता तयार होत आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. मंदिर तयार होत आहे, हे पाहून समाधान मिळत आहे, असेही तोगडिया म्हणाले. 

दरम्यान, राम मंदिर निर्माण करण्यासाठी जसे अभियान राबवण्यात आले. तसेच आता गरिबी मुक्त भारतसाठी विशेष अभियान राबवणे आवश्यक आहे. राम मंदिर आंदोलन सुरू झाले, तेव्हा मी तीन बाबी समोर ठेवल्या होत्या. प्रत्येक हिंदूला अन्न, स्वस्त आणि चांगले शिक्षण, युवकांना रोजगार, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची, पीकांची चांगली किंमत मिळायला हवी, असा प्रस्ताव मांडला होता, याची आठवड तोगडिया यांनी यावेळी बोलताना करून दिली.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याmathura-pcमथुरा