"…उसको अपने खुदा होने पे बहुत यकीं था!", जुना VIDEO शेअर करत प्रवेश वर्मा यांचा केजरीवालांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 23:44 IST2025-02-09T23:44:27+5:302025-02-09T23:44:56+5:30
नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपचे परवेश वर्मा यांनी ४०८९ मतांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. या विजयानंतर, भाजपमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

"…उसको अपने खुदा होने पे बहुत यकीं था!", जुना VIDEO शेअर करत प्रवेश वर्मा यांचा केजरीवालांवर निशाणा
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला आहे. भाजपने ४८ जागा जिंकत सत्तेची चावी आपल्या हाती घेतली आहे. आम आदमी पक्षाला केवळ २२ जागा मिळाल्या. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांसारखे पक्षाचे वरिष्ठ नेतेही पराभूत झाले. नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपचे परवेश वर्मा यांनी ४०८९ मतांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. या विजयानंतर, भाजपमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
जुना व्हिडिओ शेअर करत प्रवेश वर्मा यांचा केजरीवालांवर निशाणा -
दरम्यान, प्रवेश वर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केजरीवाल यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. याच बरोबर व्हिडिओमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांचे आव्हान कशा पद्धतीने स्वीकारले आणि दिल्लीत ४८ जागा जिंकल्या, हे देखील दाखवण्यात आले आहे.
काय म्हणाले प्रवेश वर्मा? -
प्रवेश वर्मा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये केजरीवाल म्हणत आहेत, "मी नरेंद्र मोदीजी यांना सांगू इच्छितो की, मोदीजी, आपण या जन्मात तरी दिल्लीमध्ये आम्हाला आम आदी पार्टीला हरवू शकत नाही. यासाठी आपल्याला दुसरा जन्म घ्यावा लागेल." यानंतर, पंतप्रधान मोदींची एक क्लिप येते, यात मोदी म्हणत आहेत, संपूर्ण दिल्लीत एकच आवाज घुमत आहे, ''आप-दा' नही सहेंगे, बदल के रहेंगे'. हा व्हिडिओ शेअर करत प्रवेश वर्मा यांनी, ""इक शख्स जो यहां तख्त नशीं था, उसको अपने खुदा होने पे बहुत यकीं था." असे लिहिले आहे.
"इक शख्स जो यहां तख्त नशीं था,
— Parvesh Sahib Singh (@p_sahibsingh) February 9, 2025
उसको अपने खुदा होने पे बहुत यकीं था।" pic.twitter.com/pOIKsuxrlZ
महत्वाचे म्हणजे, या निवडणुकीत भाजपने तब्बल 26 वर्षांहूनही अधिक कालावधीनंतर, दिल्लीची सत्ता मिळवली आहे.