प्रवीण तोगडियांचा मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा, राम मंदिराच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 11:32 AM2018-04-17T11:32:28+5:302018-04-17T11:40:47+5:30

Praveen Togadia ram mandir ayodhya issue today fast vhp Narendra modi | प्रवीण तोगडियांचा मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा, राम मंदिराच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण

प्रवीण तोगडियांचा मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा, राम मंदिराच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण

Next
ठळक मुद्देराम मंदिर बांधणीसाठी प्रवीण तोगडिया आक्रमकप्रवीण तोगडिया यांचा मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्राराम मंदिर बांधणीसाठी प्रवीण तोगडियांचे बेमुदत उपोषण

नवी दिल्ली - अयोध्यामध्ये राम मंदिर निर्माणासंदर्भात मोदी सरकारवरील दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर प्रवीण तोगडियादेखील राम मंदिर उभारणीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. तोगडिया यांनी मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारत राम मंदिर उभारणीसंदर्भात वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिर बांधणीच्या मागणीसाठी तोगडिया मंगळवारपासून (17 एप्रिल) बेमुदत उपोषणाला बसले आहेत. 

प्रवीण तोगडिया यांनी 32 वर्षांपर्यंत विहिंपचे अध्यक्षपद भूषवले आहे. दरम्यान, तोगडिया यांनी विहिंपचे नवीन अध्यक्ष एस.कोकजे यांनाही आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा आग्रह केला आहे. कोकजे यांनी एक तर उपोषणामध्ये सहभागी व्हावं किंवा त्यांनी राम मंदिर निर्माणासंबंधी संसदेत विधेयक आणण्यासाठी दबाव निर्माण करावा, अशी मागणी तोगडिया यांनी केली आहे. 

तोगडिया यांनी असेही सांगितले की,विश्व हिंदू परिषदेने म्हटले होते, आम्हाला (संघ परिवार) संसदेत बहुमत मिळाले तर आम्ही विधेयक संमत करून राम मंदिर उभारण्याचा मार्ग सुकर करण्यात येईल. परिषदेने लोकांना अयोध्येत कार सेवा करताना प्राण पणाला लावण्याचे आवाहन केले होते. सुमारे 60 लोकांनी आपले प्राण त्यासाठी गमावले. गुजरातमधील हजारो जणांनी यासाठी आपले योगदान दिले होते.  

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना तोगडिया म्हणालेत की, ''सीमेवर जवान सुरक्षित नाहीत, शेतकरी आत्महत्या करत आहेत. आमच्या मुली स्वतःच्या घरात सुरक्षित नाहीत आणि पंतप्रधान परदेश दौऱ्यावर गेले आहेत''. दरम्यान, विहिंपच्या नव्या कार्यकारिणीत तोगडिया समर्थकांना स्थान देण्यात आलेले नाही.
 

Web Title: Praveen Togadia ram mandir ayodhya issue today fast vhp Narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.