प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश लवकरच?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 09:01 IST2022-04-22T09:00:55+5:302022-04-22T09:01:26+5:30

काँग्रेसचे चिंतन शिबिर राजस्थानमधील उदयपूर येथे होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे शिबिर आयोजित करण्याचे जवळपास नक्की झाले आहे.  

Prashant Kishor's entry into Congress soon | प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश लवकरच?

प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश लवकरच?

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेस पक्षात लवकरच प्रवेश होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. हा प्रवेश पुढील आठवड्यात होईल, असे समजते.

प्रशांत किशोर यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व इतर नेत्यांशी तीन वेळा भेट घेतली आहे. प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची रणनीती काय राहील, यावर दिलेल्या प्रेझेन्टेशनवर समिती स्थापन केली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशांत किशोर यांच्याबद्दल निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे. 

मेमध्ये चिंतन शिबिर
काँग्रेसचे चिंतन शिबिर राजस्थानमधील उदयपूर येथे होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे शिबिर आयोजित करण्याचे जवळपास नक्की झाले आहे.  
 
Web Title: Prashant Kishor's entry into Congress soon