Prashant Kishor: निवडणूक रणनीतिकार आणि 'जन सुराज' पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर (पीके) यांनी आपल्या उत्पन्न आणि फंडिंगबाबत मोठा खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संपत्तीबाबत विविध दावे आणि टीका केली जात होती. सोमवारी पाटण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या कमाईचा एक आश्चर्यजनक आकडा उघड केला. तसेच, कमाईचा स्त्रोतही सांगितला.
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि खासदार संजय जायसवाल यांनी पीकेंच्या फंडिंग आणि उत्पन्नावर प्रश्न उपस्थित केले होते. याला उत्तर देताना पीकेंनी आपली कमाई, त्यावर भरलेला कर, आणि 'जन सुराज'ला दिलेल्या आर्थिक मदतीचे पूर्ण तपशील मांडले. प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले की, आर्थिक वर्ष २०२१-२२ पासून आतापर्यंत, म्हणजे गेल्या तीन वर्षांत पीकेंनी तब्बल ₹२४१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यांची संपूर्ण कमाई निवडणूक रणनीती आणि सल्लागार सेवांमधून मिळालेली आहे.
कमाईचा स्रोत आणि करांचा तपशील
प्रशांत किशोर म्हणाले, माझी कमाई फक्त आणि फक्त सल्लागार सेवांमधून झाली आहे. कोणताही व्यक्ती किंवा कंपनीने माझ्याकडून सल्ला घेतला, तर त्यांच्याकडूनच मी शुल्क घेतले आहे. मी गेल्या ३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई केली. त्यातील ₹३०.९५ कोटींचा GST आणि ₹२० कोटींचा इनकम टॅक्सही भरला आहे. याशिवाय, जन सुराज पक्षाला वैयक्तिक खात्यातून ₹९८.७५ कोटी दान दिल्याचेही सांगितले.
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी!
प्रशांत किशोर यांनी दावा केला की, त्यांनी एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी शुल्क घेतले आहे. त्यांनी उदाहरण देताना सांगितले की, नवयुगा कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीने त्यांच्याकडून फक्त २ तासांसाठी भेट घेतली आणि सल्ला मागितला, त्यासाठी ₹११ कोटी रुपये शुल्क दिले होते. माझा हेतू बिहारमधून पैसा कमवणे नाही, तर इथे बदल घडवणे आहे. मी माझी सर्व कमाई बिहारच्या सुधारणेसाठी खर्च करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Web Summary : Prashant Kishor disclosed his ₹241 crore income over three years from election strategy consulting. He paid ₹30.95 crore GST and ₹20 crore income tax. Kishor also donated ₹98.75 crore to Jan Suraaj, including ₹11 crore from a two-hour consultation.
Web Summary : प्रशांत किशोर ने चुनावी रणनीति परामर्श से तीन वर्षों में ₹241 करोड़ की आय का खुलासा किया। उन्होंने ₹30.95 करोड़ जीएसटी और ₹20 करोड़ आयकर का भुगतान किया। किशोर ने जन सुराज को ₹98.75 करोड़ का दान भी दिया, जिसमें दो घंटे के परामर्श से ₹11 करोड़ शामिल हैं।