शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार 'तसं काहीच नाही' म्हणाले; प्रशांत किशोर ३ दिवसांत दुसऱ्यांदा भेटीसाठी पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 11:35 IST

गेल्या १५ दिवसांत पवार आणि किशोर यांची तीनदा भेट; एकदा मुंबईत, दोनदा दिल्लीत बैठका

नवी दिल्ली: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. पवार आणि किशोर यांची गेल्या ३ दिवसांतील ही दुसरी भेट आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी काल विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक झाली. यानंतर आज प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. पवार आणि किशोर यांच्यात परवाच एक बैठक झाली होती. गेल्या तीन दिवसांत पवार आणि किशोर यांच्यात होत असलेली ही दुसरी बैठक आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.‘राष्ट्रमंच’ केंद्र सरकारला दिशा देण्याचे काम करणार; शरद पवार यांच्या घरातील बैठकीत निर्णय 

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट, त्यानंतर पवारांच्या घरी पार पडलेली विरोधकांची बैठक यानंतर तिसऱ्या आघाडीचा विषय चर्चेत आला. काँग्रेस, भाजपेतर पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न पवारांकडून सुरू आहे का, अशी चर्चादेखील सुरू झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे पवार राष्ट्रपती पदासाठी मोर्चेबांधणी करत आहेत का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. त्यावर आम्हाला संख्याबळाची कल्पना आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठीची उमेदवारी हा काही विषय नाही, असं शरद पवारांनी सांगितल्याचं वृत्त 'एबीपी माझा'नं दिलं आहे.

विरोधकांच्या बैठकीआधी शरद पवारांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी प्रशांत किशोर यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर कालच पवार विरोधी पक्षातील नेत्यांना भेटले. या बैठकीत तिसऱ्या आघाडीबद्दल चर्चा न झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन यांनी दिली. याशिवाय राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीतही रस नसल्याचं पवारांनी सांगितलं. यानंतर आता प्रशांत किशोर पुन्हा एकदा पवारांच्या भेटीला गेले आहेत. गेल्या १५ दिवसांमधील ही तिसरी भेटआहे. याआधी मुंबईत ११ जूनला पवार आणि किशोर यांची बैठक झाली होती. त्यानंतर २१ जूनला पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी पवार आणि किशोर यांच्यात जवळपास साडे तीन तास चर्चा झाली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPrashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाcongressकाँग्रेसRamnath Kovindरामनाथ कोविंद