विरोधकांचे ऐक्य आणि पदयात्रेद्वारे प्रशांत किशोर यांचे भाजपला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 09:29 AM2022-05-06T09:29:50+5:302022-05-06T09:30:16+5:30

चंद्रशेखर व जेपी दोन्ही भूमिका निभावण्याचा प्रयत्न.

Prashant Kishor challenges BJP through unity of opposition and march No Party For Now Announces 3000 km Bihar Padyatra | विरोधकांचे ऐक्य आणि पदयात्रेद्वारे प्रशांत किशोर यांचे भाजपला आव्हान

विरोधकांचे ऐक्य आणि पदयात्रेद्वारे प्रशांत किशोर यांचे भाजपला आव्हान

Next

शरद गुप्ता 
नवी दिल्ली : बिहारच्या सर्व विरोधी पक्षांना एकाच व्यासपीठावर आणण्याची आणि ३००० किलोमीटरची पदयात्रा काढण्याची घोषणा करून प्रशांत किशोर एकाच वेळी जयप्रकाश नारायण, हरकिशन सिंह सुरजीत व चंद्रशेखर यांची भूमिका बजावू पाहत असल्याची चर्चा आहे. वेगाने घोडदौड करणारा भाजपचा विजय रथ रोखण्यासाठी चाणक्य बनण्याच्या ते प्रयत्नात आहेत.

संपूर्ण क्रांतीच्या घोषणेनंतर १९७५मध्ये जेपी यांनी बिहारच्या सर्व विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणले होते. हळूहळू त्यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय स्तरावर विरोधकांच्या ऐक्याला जन्म दिला व त्यामुळे १९७७च्या निवडणुकीत जनता पार्टीचे सरकार स्थापन झाले. हेच काम १९९६मध्ये माकपाचे सरचिटणीस हरकिशन सिंह सुरजीत यांनी केले. त्यांच्यामुळेच मुलायम सिंह यादव व लालूप्रसाद यादव आपसातील मतभेद असतानाही एच. डी. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल यांच्या सरकारांना समर्थन देण्यास तयार झाले होते. तर दुसरीकडे भारतात पदयात्रेद्वारे राजकीय ओळख निर्माण करण्याचा इतिहास राहिलेला आहे. 

१९८३ मध्ये माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी ४००० किलोमीटरची पदयात्रा काढून तत्कालीन इंदिरा गांधी सरकारच्या विरोधात राष्ट्रव्यापी वातावरण तयार केले होते.  आंध्र प्रदेशमध्ये २००३मध्ये वायएस राजशेखर रेड्डी (१५०० किलोमीटर), २०१३मध्ये चंद्राबाबू नायडू (१७०० किलोमीटर) व २०१९मध्ये जगनमोहन रेड्डी (३००० किलोमीटर) यांनी पदयात्रांद्वारे सरकारे उलथवली होती.

  • २०१४मध्ये तत्कालीन पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह, अरविंद केजरीवाल व नितीशकुमार यांच्यासाठी निवडणूक रणनीती तयार केल्यावर प्रशांत किशोर २०२०मध्ये स्वत:चा पक्ष स्थापन करू इच्छित होते. 
  • ते १०० दिवसांत १० लाख युवकांना आपल्या ‘बात बिहार की’ मोहिमेशी जोडू इच्छित होते. परंतु ते यशस्वी झाले नाही. त्यानंतर त्यांनी एम. के. स्टालिन, ममता बॅनर्जी व जगनमोहन रेड्डी यांच्यासाठी यशस्वी निवडणूक रणनीती बनवली होती. 
     

राजकारणात अयशस्वी 

  • प्रशांत किशोर जनता दल (यू)मध्ये सहभागी झाले होते व पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले होते. परंतु पक्षातील जुन्या नेत्यांच्या विरोधामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला 
  • होता. 
  • अशीच काही स्थिती त्यांची काँग्रेसबाबतही झाली होती. मागील महिन्यात ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या समर्थकांच्या विरोधामुळे ते पक्षात सहभागी होऊ शकले नव्हते.

Web Title: Prashant Kishor challenges BJP through unity of opposition and march No Party For Now Announces 3000 km Bihar Padyatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.