शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

प्रशांत किशोर यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा; मिळणार 'इतके' वेतन व 'या' सुविधा

By देवेश फडके | Published: March 01, 2021 6:59 PM

राजकारणातील चाणक्य मानल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना आता पंजाबमध्ये कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला गेला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे प्रमुख सल्लागार म्हणून प्रशांत किशोर आता काम पाहणार आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देप्रशांत किशोर यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जाअमरिंदर सिंग यांचे प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्तीआगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्याची चर्चा

चंदीगड : राजकारणातील चाणक्य मानल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना आता पंजाबमध्ये कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला गेला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे प्रमुख सल्लागार म्हणून प्रशांत किशोर आता काम पाहणार आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. (prashant kishor appointment as principal advisor to the cm captain amarinder singh and status of a cabinet minister) 

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी एक ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली. मला सांगायला आनंद होत आहे की, प्रशांत किशोर यांची माझे प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंजाबच्या जनतेच्या कल्याणासाठी एकत्रित काम करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे, असे अमरिंदर सिंग यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

प्रशांत किशोर किती वेतन घेणार?

प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर केवळ एक रुपया वेतन घेणार आहेत. तसेच प्रशांत किशोर यांना बंगला, कार्यालय, संपर्क माध्यमे अशा अनेक प्रकारच्या सुविधा पंजाब सरकारकडून दिल्या जाणार आहेत. तसेच कॅबिनेट मंत्र्याप्रमाणे प्रवास, मेडिकल आणि अन्य सुविधा प्रशांत किशोर यांना दिल्या जातील, असे सांगितले जात आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे हनुमान, कोरोना लस ही संजीवनी; भाजप नेत्याची स्तुतीसुमनं

प्रशांत किशोर यांचा कार्यकाळ किती?

प्रशांत किशोर यांच्या कार्यकाळाबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याप्रमाणे प्रशांत किशोर यांचा कार्यकाळ असेल. प्रशांत किशोर यांना एक खासगी सचिव, एक डेटा एन्ट्री ऑपरेटर, क्लार्क आणि दोन शिपाई दिले जाणार आहेत. एवढेच नव्हे, तर प्रशांत किशोर यांच्या मोबाइल आणि संपर्काचा खर्चही सरकारकडून केला जाईल, असे सांगितले जात आहे. 

पंतप्रधान मोदींनी सर्वांत आधी कोरोना लस का घेतली नाही; काँग्रेसचा सवाल

दरम्यान, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही यापूर्वी अनेकदा प्रशांत किशोर यांच्या कार्याबाबत कौतुकोद्गार काढले आहेत. २०१७ मध्ये प्रशांत किशोर यांच्यावर पाच राज्यांचे निवडणूक कार्यक्रम, प्रचार आणि रणनीती तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यामध्ये केवळ पंजाबमध्ये काँग्रेसला बहुमताचे सरकार स्थापन करण्यास यश मिळाले आहे. परंतु, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला फारसी चमक दाखवता आली नाही. तरीही प्रशांत किशोर यांची काँग्रेसकडून स्तुती करण्यात आली होती. तसेच सन २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाने प्रशांत किशोर यांना रणनितीकार म्हणून सोबत घेतले होते. यानंतर प्रशांत किशोर यांनी जनता दल युनायटेड पक्षासाठीही काम केले. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरPoliticsराजकारणPunjabपंजाबcongressकाँग्रेस