प्रशांत किशोर यांचा २०२४ चा फॉर्म्युला, काँग्रेस शिवसेना-राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 11:31 AM2022-04-18T11:31:55+5:302022-04-18T11:32:46+5:30

प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वाला जो फॉर्म्युला सांगितला आहे ज्यात देशातील सर्व ५४३ लोकसभा जागांऐवजी काँग्रेसनं काही निवडक जागांवर लक्ष केंद्रीत करावं असं म्हटलं आहे.

Prashant Kishor 2024 formula for Election, Congress will alliance with Shiv Sena-NCP? | प्रशांत किशोर यांचा २०२४ चा फॉर्म्युला, काँग्रेस शिवसेना-राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार?

प्रशांत किशोर यांचा २०२४ चा फॉर्म्युला, काँग्रेस शिवसेना-राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार?

Next

नवी दिल्ली – एकापाठोपाठ एक होणाऱ्या निवडणुकांमध्ये सातत्याने होणाऱ्या पराभवामुळे काँग्रेसमध्ये निराशा पसरली आहे. काँग्रेसला(Congress) नव संजीवनी देण्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर(Prashant Kishore) यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांच्यासमोर फॉर्म्युला ठेवला आहे. काँग्रेसची भरकटलेली दिशा पुन्हा रुळावर आणण्यासाठी पीकेने एक रोडमॅप तयार केला आहे. २०२४ च्या निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांचे हे प्रेझेंटेशन आहे.

शनिवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या १० जनपथ निवासस्थानी राहुल गांधी, प्रियंका गांधी, दिग्विजय सिंह, के.सी वेणुगोपाळ, अंबिका सोनी, मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत प्रशांत किशोर यांनी काँग्रेस आणि २०२४ निवडणूक याबाबत एक्शन प्लॅन सादर केला. पीकेने काँग्रेसच्या मीडिया रणनीतीत बदल करणे, संघटना मजबूत करणे आणि त्या राज्यांवर फोकस करणे ज्याठिकाणी भाजपाशी थेट मुकाबला आहे. पीकेचा प्लॅन आणि फॉर्म्युला यासाठी काँग्रेस नेत्यांचा एक गट बनवला आहे. आठवडाभरात हा गट सोनिया गांधींना रिपोर्ट देईल. त्यानंतर पीकेची काँग्रेसमध्ये एन्ट्री आणि फॉर्म्युला प्रत्यक्षात अंमलात आणण्याचं काम हाती घेतले जाईल.

३७० जागांवर लक्ष केंद्रीत

प्रशांत किशोरने काँग्रेस नेतृत्वाला जो फॉर्म्युला सांगितला आहे ज्यात देशातील सर्व ५४३ लोकसभा जागांऐवजी काँग्रेसनं काही निवडक जागांवर लक्ष केंद्रीत करावं. विशेष म्हणजे काँग्रेसनं अशा ठिकाणी निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी जिथे पक्षसंघटन मजबूत आहे. ५४३ जागांऐवजी मोजक्या ३६५ ते ३७० जागा निवडून त्याठिकाणी उमेदवार उतरवावे. त्यामुळे पक्षाला त्याचा फायदा होईल. तसेच इतर १७० ते १८० जागांवर काँग्रेसचे सहकारी पक्ष निवडणूक लढवतील. ज्याठिकाणी भाजपाशी थेट मुकाबला आहे अशा जागांवर पक्षाने लढत द्यावी असं पीकेने सांगितले आहे.

यूपी-बिहार-ओडिशात एकला चलो रे

देशातील ज्या राज्यात काँग्रेसची स्थिती मजबूत आहे त्याठिकाणी पक्षाने लक्ष द्यावे. त्या राज्यात आघाडी युती ऐवजी एकला चलो रे यावर भर द्यावा. त्यात गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड याठिकाणी काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवावी. त्याशिवाय बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यातही काँग्रेसनं एकटं लढावं. जेणेकरून या राज्यात हरवलेला जनाधार पुन्हा परत मिळवता येईल.

बंगाल, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात आघाडी

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला ज्या राज्यात आघाडी करून निवडणूक लढण्याचा सल्ला दिलाय ज्याठिकाणी स्थानिक प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू सारख्या राज्यात काँग्रेसनं आघाडीत निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादीसोबत(Shivsena-NCP) काँग्रेस सरकारमध्ये आहे. तामिळनाडूत डिएमकेसोबत आघाडी आहे. तर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसनं डाव्या पक्षांऐवजी टीएमसीसोबत निवडणूक लढवावी असा फॉर्म्युला पीकेने काँग्रेस नेतृत्वाला सांगितला आहे.  

 

Web Title: Prashant Kishor 2024 formula for Election, Congress will alliance with Shiv Sena-NCP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.