प्रशांत भूषण यांनी दंडाचा एक रुपया सर्वोच्च न्यायालयात भरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 06:58 IST2020-09-15T02:52:25+5:302020-09-15T06:58:42+5:30

भूषण यांच्यावर याआधीपासून सुरू असलेल्या अवमानविषयक खटल्यांमध्ये अपील करण्याचा आपल्याला अधिकार आहे, अशी भूमिका मांडत शनिवारी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Prashant Bhushan paid the fine of one rupee in the Supreme Court | प्रशांत भूषण यांनी दंडाचा एक रुपया सर्वोच्च न्यायालयात भरला

प्रशांत भूषण यांनी दंडाचा एक रुपया सर्वोच्च न्यायालयात भरला

नवी दिल्ली : न्यायालयाच्या अवमान प्रकरणामध्ये दोषी ठरवत ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने ठोठावलेला एक रुपयाचा दंड त्यांनी सोमवारी भरला. मात्र, याचा अर्थ मी न्यायालयाचा निकाल स्वीकारला असा होत नाही, असेही प्रशांत भूषण यांनी स्पष्ट केले.
भूषण म्हणाले, माझ्यावरील खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात फेरविचार याचिका दाखल केली आहे. भूषण यांच्यावर याआधीपासून सुरू असलेल्या अवमानविषयक खटल्यांमध्ये अपील करण्याचा आपल्याला अधिकार आहे, अशी भूमिका मांडत शनिवारी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या व वेगळ््या खंडपीठापुढे व्हावी, अशी मागणी प्रशांत भूषण यांनी केली आहे.

Web Title: Prashant Bhushan paid the fine of one rupee in the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.