शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

प्रणव मुखर्जी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, पंचत्वात विलीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 14:45 IST

प्रणव मुखर्जी यांना 10 ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्यातील रक्ताच्या गाठी काढण्यासीठी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. यानंतर त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला. ते व्हेंटीलेटरवर होते. 

नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे सोमवारी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर आज (मंगळवार) लोधी स्मशान घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना 10 ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्यातील रक्ताच्या गाठी काढण्यासाठी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. ते व्हेंटीलेटरवर होते. प्रणव दा यांना कोरोना संसर्गदेखील झाला होता. यामुळे एसओपीअंतर्गत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे पुत्र अभिजीत बॅनर्जी आणि कुटुंबातील सदस्यदेखील पीपीई किट घालून उपस्थित होते.

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह अनेकांनी प्रणव मुखर्जींना अर्पण केली श्रद्धांजली -तत्पूर्वी, 10 राजाजी मार्ग येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण केली. केंद्र सरकार ने त्यांच्या सन्मानार्थ 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यंत सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. यानंतर पश्चिम बंगाल सरकारनेही दुखवटा जाहीर केला आहे.  सोमवारी प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पीएम मोदी, अमित शाह, लालकृष्ण आडवाणी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला. 

प्रणव मुखर्जी यांनी २०१२ ते २०१७ या काळात देशाचे राष्ट्रपतीपद सांभाळले होते. तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये वित्त, संरक्षण, परराष्ट्र यासह विविध महत्त्वपूर्ण पदांवर काम केले होते. तसेच लोकसभा आणि राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले होते. त्याबरोबरच विविध संसदीय समित्यांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली होती. प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने भारतरत्न देऊन सन्मानित केले होते.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जी