शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Prakash Raj : "तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्याने असं केलं असतं तर..."; प्रकाश राज यांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 12:14 IST

Prakash Raj And BJP Amit Shah : अभिनेते प्रकाश राज यांनीही यावरुन भाजपावर टीका केली आहे. तसेच अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत (Asia Cup 2022)  पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर रोमहर्षक विजयाची नोंद केली. भारताच्या या विजयाचे देशात सेलिब्रेशन करण्यात आले. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारताचा गजर घुमला... पण, BCCI सचिव जय शाह (Jay Shah) यांची एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे. गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे आशियाई क्रिकेट संघटनेचे अध्यक्षही आहेत. तेही हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते आणि भारताच्या विजयानंतर ते पेव्हेलियनमध्ये उभे राहून टाळ्या वाजवू लागले. अशात त्यांच्या शेजारी असलेल्या व्यक्तीने त्यांना तिरंगा देऊ केला, परंतु जय शाह यांनी नकार दिला. 

जय शाह यांचा हाच व्हिडीओ विरोधकांनी सोशल मीडियावर पोस्ट केला असून यावरून टीकेला सुरुवात केली आहे. नेटीझन्सनीही ट्रोलिंग सुरू केले. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत ट्विट केलं आहे. "मेरे पास पापा हैं, तिरंगा अपने पास रखो!" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. याच दरम्यान आता अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनीही यावरुन भाजपावर टीका केली आहे. तसेच अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

प्रकाश राज यांनी "प्रिय सर्वोच्च नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह… जय शाह यांनी त्यांची राष्ट्रभक्ती सिद्ध करण्यासाठी भारताचा तिरंगा हातात धरुन फडकवायला हवा हे गरजेचं नाही. पण जर कुणी नॉन भाजपा, नॉन हिंदू किंवा माझ्याप्रमाणेच तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्या एखाद्या व्यक्तीने असं काही केलं असतं, तर त्यावर तुमची किंवा भाजपाच्या भक्तमंडळींची काय प्रतिक्रिया असती" असा सवाल केला आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. 

"तिरंग्यापासून दूर राहण्याची यांची जुनी सवय"; जय शाह यांना टोला

काँग्रेसने जय शाह यांना लक्ष्य केलं आहे. "तिरंग्यापासून दूर राहण्याची यांची जुनी सवय आहे" असा टोला लगावला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीनेही ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली आहे. "हे कृत्य बिगर भाजपा नेत्याने केलं असतं, तर काय झालं असतं? भाजपाच्या आयटी विंगने त्या व्यक्तीला देशद्रोही म्हटलं असतं" असं ट्वीट टीआरएसचे सोशल मीडिया प्रमुख कृष्णन यांनी केलं आहे. 

 

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राजAmit Shahअमित शाहBJPभाजपाJay Shahजय शाह