शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

अमित शहांनी सांगितलं प्रज्ञा सिंहांना उमेदवारी देण्यामागचं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 17:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पहिल्यांदा अमित शाह पत्रकार परिषदेला संबोधित करत आहेत.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पहिल्यांदाच अमित शाहांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं आहे. पत्रकार परिषदेत साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारीवर अमित शाह म्हणाले, त्यांना उमेदवारी हा काँग्रेसच्या विरोधात आमचा सत्याग्रह आहे. काँग्रेसनं खोटी हिंदू दहशतवादाची संकल्पना आणली. विनाकारण लोकांना त्रास देण्याचं काम केलं. मतांच्या धुव्रीकरणासाठीच काँग्रेसनं असं केलं. काँग्रेसनं असं करून हिंदू संस्कृतीला पूर्णतः बदनाम केलं. काँग्रेसनं खोटी केस बनवल्याप्रकरणी देशाची माफी मागावी, असंही अमित शाह म्हणाले आहेत.मी काँग्रेस पक्षाला विचारू इच्छितो की, समझोता एक्स्प्रेसमध्ये काही लोकांना पकडण्यात आलं. एक खोटी केस बनवून हिंदू दहशतवादाचं त्याला नाव देण्यात आलं. समझोता एक्स्प्रेसमधील लोकांची निर्दोष मुक्तता झाली असून, त्यांना 5-5 लाखांचा मोबदलाही मिळाला आहे. काँग्रेसनं देशाच्या सुरक्षेबरोबर समझोता केला. त्याबद्दल काँग्रेसनं पूर्ण जगासमोर माफी मागायला हवी, असंही अमित शाह म्हणाले आहेत. भाजपाचं सरकार पुन्हा बनवण्यासाठी जनतेचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. भाजपा एक संघटनात्मक काम करणारा पक्ष राहिला आहे. संघटन आमच्या सर्वच कामाचं प्रमुख अंग राहिलं आहे. 2014मध्ये जनतेनं ऐतिहासिक जनादेश दिला होता.पहिल्यांदाच पूर्ण बहुतमानं देशात बिगर काँग्रेस सरकार आलं होतं. मोदी सरकार जनतेच्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करेल हे आम्ही तेव्हाच ठरवलं होतं. मोठ्या बहुमतानं पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येईल. मोदी सरकारनंही प्रत्येक 15 दिवसांनी एक नवी योजना आणून प्रत्येक वर्गाची प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. मोदी सरकारनं आणलेल्या 133 योजनांचा समाजातल्या प्रत्येक वर्गालालाभ मिळाला. शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळाला.2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही चांगलं यश मिळवलं. 'नरेंद्र मोदी प्रयोग' देशानं स्वीकारला आहे. देशाच्या विकासात आपलाही सहभाग आहे ही गोरगरीब जनतेची भावना आहे. सव्वाशे कोटी देशवासीयांमध्ये असुरक्षितेतची भावना नाही. या निवडणुकीत विरोधकांकडून महागाई आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा नाही. आम्ही 16 जानेवारीपासून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. आम्हाला चांगले निकाल मिळतील अशी आशा आहे, असंही अमित शाह म्हणाले आहेत. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९