शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

प्रज्ञा - पन्नास हजार भाविकांनी घेतले भुलेश्वरी दर्शन

By admin | Updated: August 17, 2015 22:38 IST

भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील श्रीक्षेत्र भुलेश्वर येथे आज श्रावणातील पहिल्या सोमवारी रांगेत उभे राहून जवळपास ५० हजारांवर भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.

भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील श्रीक्षेत्र भुलेश्वर येथे आज श्रावणातील पहिल्या सोमवारी रांगेत उभे राहून जवळपास ५० हजारांवर भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.
रात्री बारानंतर अनेक भाविकांनी भुलेश्वरी शिवलिंगाचे दर्शन घेतले. पहाटे पाच वाजता शिवलिंगाला दही, दूध व पंचामृताने अंघोळ घालण्यात आली. पिंड व लिंग विविधरंगी फुलांनी सजवण्यात आले. पूजा करून महाआरती करण्यात आली. सकाळी सहा वाजता पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांनी माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने पूजा केली. या वेळी श्री भुलेश्वर देवस्थानाचे अध्यक्ष अरुण यादव, माळशिरसच्या सरपंच सुरेखा यादव, उपसरपंच काकासाहेब यादव, संतोष यादव, सर्कल अधिकारी घाडगे, पोलीस पाटील नरेंद्र यादव, सुनील यादव, गावकामगार तलाठी मनीषा भोंगळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळी १० वाजता भुलेश्वराची पालखी माळशिरस येथील काळे वाड्यात सजवण्यात आली. पूजा केल्यानंतर पालखी माळशिरस गावातून मिरवण्यात आली. पालखी वाजतगाजत भुलेश्वर चौकात आली. या ठिकाणी आरती होऊन पालखी भुलेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाली. दुपारी बारा वाजता पालखी पाण्याच्या कुंडापाशी आली. माळशिरस व परिसरातील मानाच्या कावडींमध्ये पाणी भरण्यात आले. भुलेश्वराच्या मूर्तीला पाण्याच्या कुंडामध्ये स्नान घालण्यात आले.
महाआरती होऊन कावड व पालखी मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत कावड मिरवणूक व पालखी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी अडीच वाजता भुलेश्वर मंदिराच्या प्रवेद्वाराजवळ कावडींची पाण्याची धार घालण्यात आली. त्यानंतर भुलेश्वर पालखी मंदिरासमोर ठेवण्यात आली.
जेजुरी पोलीस ठाण्याच्या वतीने रांगेत उभे राहण्याची जाळी देण्यात आल्याने दर्शन रांगेतच घ्यावे लागले. जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी केलेल्या अवाहनामुळे हुल्लडबाजी होऊ शकली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पिण्याच्या पाण्याचा टँकर देण्यात आला होता. माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य सेवा देण्यात आली. बालाजी देवस्थानच्या वतीने स्वयंसेवक देण्यात आले होते. माळशिरस गावाच्या वतीने १० ग्रामसुरक्षा दल हजर होते. भिवडी गावचे राहुल गायकवाड, माळशिरसचे संतोष यादव, बाळासाहेब बंडगर, लक्ष्मण बंडगर, म्हफाजी बंडगर, हाबाजी बंडगर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
०००