सत्तेचे वारे..भाग एक
By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST
जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल काहीही लागो पण निवडणुका झाल्यानंतरही कायतू व मिकी यांच्यातील वितुष्ट कायम राहिल. उलट दरी आणखी रुंदावेल व त्या पक्षात फुट पडू शकते, अशी स्थिती आहे. गोव्याच्या राजकारणात केवळ दोन आमदार देखील एका पक्षात चांगल्या प्रकारे राहू शकत नाही असा अनुभव अनेकदा आला आहे. दोन आमदारही एकत्र राहत नाही कारण राजकीय पक्षांसमोर ध्येयधोरण असे काही असत नाही. एखाद्या तत्त्वज्ञानाने आमदारांना बांधून ठेवले आहे असे चित्र कधी दिसत नाही. 2007 च्या निवडणुकीवेळी चर्चिल आलेमाव यांनी सेव्ह गोवा पक्ष स्थापन केला होता, तेव्हा त्या पक्षाच्या तिकीटावर चर्चिल हे नावेलीतून तर आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे कुडतरी मतदारसंघातून निवडून आले. नंतर काही महिन्यांनी रेजिनाल्ड व चर्चिल हे एकमेकांचे शत्रू बनले. तत्पूर्वीच्या काळात म्हणजे 2003-04 साली सुदिन ढवळ
सत्तेचे वारे..भाग एक
जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल काहीही लागो पण निवडणुका झाल्यानंतरही कायतू व मिकी यांच्यातील वितुष्ट कायम राहिल. उलट दरी आणखी रुंदावेल व त्या पक्षात फुट पडू शकते, अशी स्थिती आहे. गोव्याच्या राजकारणात केवळ दोन आमदार देखील एका पक्षात चांगल्या प्रकारे राहू शकत नाही असा अनुभव अनेकदा आला आहे. दोन आमदारही एकत्र राहत नाही कारण राजकीय पक्षांसमोर ध्येयधोरण असे काही असत नाही. एखाद्या तत्त्वज्ञानाने आमदारांना बांधून ठेवले आहे असे चित्र कधी दिसत नाही. 2007 च्या निवडणुकीवेळी चर्चिल आलेमाव यांनी सेव्ह गोवा पक्ष स्थापन केला होता, तेव्हा त्या पक्षाच्या तिकीटावर चर्चिल हे नावेलीतून तर आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे कुडतरी मतदारसंघातून निवडून आले. नंतर काही महिन्यांनी रेजिनाल्ड व चर्चिल हे एकमेकांचे शत्रू बनले. तत्पूर्वीच्या काळात म्हणजे 2003-04 साली सुदिन ढवळीकर व पांडुरंग मडकईकर हे दोघे म.गो. पक्षाचे आमदार होते पण मडकईकर यांनी मंत्री ढवळीकर यांना त्यावेळी रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याच काळात बाबूश मोन्सेरात, मिकी पाशेको व स्वर्गीय माथानी साल्ढाणा हे युगोडेपाचे आमदार होते. त्यावेळी बाबूशने युगोडेपास रामराम ठोकत भाजपचे घर गाठले होते. डॉ. विली डिसोझा हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री होते तेव्हा मिकी पाशेको हे राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यावेळीही डिसोझा व पाशेको यांच्यात खूप वाद रंगायचे. जिथे दोन-तीन आमदारही जास्त काळ एकत्र राहू शकत नाही तिथे मोठय़ा पक्षांबाबत व आठ-दहा आमदारांच्या गटाबाबत कायबोलावे? पाशेको यांना जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी भाजपने आपल्यासोबत ठेवले. कारण ते सध्याही भाजपसोबत सत्तेत आहेत म्हणून नव्हे. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी सासष्टीत काँग्रेसच्या आमदारांचे किती उमेदवार निवडून येतात व गोवा विकास पक्षाचे किती उमेदवार बाजी मारतात ते भाजपला पहायचे आहे. पाशेको यांची म्हणजेच त्यांच्या गोवा विकास पक्षाची शक्ती जर वाढली तर ते भाजपसाठी उपयुक्त ठरेल. कारण काँग्रेसची तेवढी जास्त हानी होईल. भाजपला सासष्टीत मते मिळत नाहीत. सासष्टी हा आपला बालेकिल्ला आहे असे काँग्रेस पक्ष मानतो. 2012च्या निवडणुकीवेळी त्यास पहिल्यांदा भाजपने सुरूंग लावला.