'अनलॉक -३' मध्ये सिनेमा हॉल उघडण्याची शक्यता, माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 12:26 PM2020-07-26T12:26:43+5:302020-07-26T12:38:12+5:30

अनलॉक -३ मध्ये सिनेमा हॉल सोबत जिम देखील उडण्यास परवानगी देण्यात येऊ शकते. मात्र, सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अद्याप शाळा आणि मेट्रो उघडण्याच्या दृष्टीने कोणताही विचार करण्यात आला नाही.

Possibility to open cinema hall in Unlock-3, proposal from Ministry of Information and Broadcasting | 'अनलॉक -३' मध्ये सिनेमा हॉल उघडण्याची शक्यता, माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून प्रस्ताव

'अनलॉक -३' मध्ये सिनेमा हॉल उघडण्याची शक्यता, माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून प्रस्ताव

Next
ठळक मुद्देमार्चमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता.गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

नवी दिल्ली : अनलॉक -३ साठी एसओपी बनविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्थात, अनलॉक -२ येत्या ३१ जुलैला संपण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अनलॉक- ३ मध्ये सोशल डिस्टंसिंचे  पालन करून सिनेमा हॉल उघडण्याची शक्यता आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने याबाबत गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे. ज्यामध्ये १ ऑगस्टपासून सिनेमा हॉल सुरू करण्यासंदर्भात म्हटले आहे.

यापूर्वी सिनेमा हॉल उघडण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालय आणि सिनेमा हॉल मालकांमध्ये अनेक बैठका झाल्या. त्यानंतर सिनेमा हॉल मालकांनी ५० टक्के प्रेक्षकांसह थिएटर सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र, मंत्रालयाला वाटते की,  सुरुवातीला २५ टक्के प्रेक्षकांसह सिनेमा हॉल सुरु करावे आणि नियमांची काटेकोरपणे करण्यात यावे.

एवढेच नाही तर अनलॉक -३ मध्ये सिनेमा हॉल सोबत जिम देखील उडण्यास परवानगी देण्यात येऊ शकते. मात्र, सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अद्याप शाळा आणि मेट्रो उघडण्याच्या दृष्टीने कोणताही विचार करण्यात आला नाही. त्याचबरोबर, राज्यांसाठी अनलॉक-३ मध्ये आणखी काही शिथिलता आणली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मार्चमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. हा लॉकडाऊन जूनपर्यंत सुरु होता. त्यानंतर ३० जूनला अनलॉक-१ अंतर्गत कोरोना संकटामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन शिथिल झाला. ज्यामध्ये आर्थिक निर्बंध उघडले गेले. त्यानंतर, १ जुलैपासून अनलॉक -२ सुरु झाला आहे. आता अनलॉक-२ येत्या ३१ जुलैला संपणार आहे.

गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दररोज सुमारे ५० हजार कोरोनाची लागण झालेले रुग्ण समोर येत आहेत. रविवारच्या आकडेवारीनुसार, कोरोना रुग्णांची संख्या देशात १३ लाख ८५ हजार ५२२ झाली आहे. मात्र,  आतापर्यंत ८,८५,५७७ लोक बरे झाले आहेत. तर ४,६७,८८२ लोकांवर उपचार सुरू आहेत.

आणखी बातम्या....

या सरकारचं भवितव्य विरोधी पक्षनेत्यांवर अवलंबून नाही; उद्धव ठाकरेंनी पुन्हा सुनावलं    

शरद पवार म्हणाले, 'रिमोट कंट्रोल नाही, संवाद हवा'; उद्धव ठाकरे म्हणाले...    

हॉट स्प्रिंगमधून चीनची माघार, पँगोंगसंदर्भात लवकरच लष्करी अधिकाऱ्यांची बैठक    
 

Web Title: Possibility to open cinema hall in Unlock-3, proposal from Ministry of Information and Broadcasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.