भाविकांची गर्दी घटण्याची शक्यता अल्प प्रतिसाद : परिवहन महामंडळाच्या अडीच हजार बस उभ्याच
By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:12+5:302015-08-28T23:37:12+5:30
नाशिक : बारा वर्षांनी येणार्या कुंभमेळ्याविषयी उत्सुकता असली तरी आत्तापर्यंत भाविकांचा जेमतेम प्रतिसाद मिळाला आहे. रात्री साडे नऊ वाजेपर्यंत केवळ बारा हजार भाविकांची वाहतूक केली असल्याचे परिवहनतर्फे स्पष्ट झाले आहे. इतकेच नव्हे तर परिवहन महामंडळाने राज्यभरातून मागविलेल्या तीन हजार बसगाड्यांपैकी २४०० बस तर रात्री नऊ वाजपर्यंत जागच्या हलल्या नाहीत असे एसटीच्या सूत्रांनी सांगितले.

भाविकांची गर्दी घटण्याची शक्यता अल्प प्रतिसाद : परिवहन महामंडळाच्या अडीच हजार बस उभ्याच
न शिक : बारा वर्षांनी येणार्या कुंभमेळ्याविषयी उत्सुकता असली तरी आत्तापर्यंत भाविकांचा जेमतेम प्रतिसाद मिळाला आहे. रात्री साडे नऊ वाजेपर्यंत केवळ बारा हजार भाविकांची वाहतूक केली असल्याचे परिवहनतर्फे स्पष्ट झाले आहे. इतकेच नव्हे तर परिवहन महामंडळाने राज्यभरातून मागविलेल्या तीन हजार बसगाड्यांपैकी २४०० बस तर रात्री नऊ वाजपर्यंत जागच्या हलल्या नाहीत असे एसटीच्या सूत्रांनी सांगितले.नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणार्या प्रत्येक पर्वणीसाठी किमान एक लाख भाविक येतील असा अंदाज सर्वच शासकीय यंत्रणांनी तयार केला आणि त्या आधारे आराखडे तयार केले. परंतु पहिल्या पर्वणीला पूर्वसंध्येला मिळणारा प्रतिसाद बघितला तर तो तुर्तास तरी प्रशासनाचा अंदाज चुकविणारा ठरला आहे. नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर येथे येणारी सर्व प्रकारची खासगी वाहने बा वाहनतळावर अडवून ठेवण्यात आली असून तेथून अंतर्गत वाहनतळापर्यंत केवळ एसटी बसनेच प्रवास करता येऊ शकतो. त्यामुळे रेल्वेचा एक अपवाद सोडला तर रस्त्याने येणार्या भाविकांचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे मत सरकारी अधिकारी व्यक्त करीत आहेत. राज्य परिवहन महामंडळाने नाशिकमध्ये असलेल्या साडे सातशे बसगाड्या वगळता अन्य जिल्ातून बस गाड्या मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे भाविकांना नेण्यासाठी तीन हजार बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु रात्री साडे नऊ वाजेपर्यंत महामंडळाने केवळ १२ हजार भाविकांची वाहतूक केली होती. आणि महामंडळाच्या २४०० बस जागच्याही हलल्या नाहीत असे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक मिलिंद बंड यांनी सांगितले. सर्वाधिक फेर्या खंबाळे ते त्र्यंबक अशा २६४ झाल्या होत्या. मोहदरी ते सिन्नरफाटा ४७ झाल्या होत्या. महामंडळाने तयार केलेल्या शंभर रुपये किमतीच्या तीन लाख पास पैकी केवळ ४८८ पास विकले गेले आहेत. शंभर रुपयांत नाशिक- त्र्यंबकेश्वर अशा दोन्ही ठिकाणी बस प्रवास करण्याची सुविधा आहे.