शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचेच आॅपरेशन होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 06:43 IST

फिर एक बार, मोदी सरकार’ अशी घोषणा देत देशाची सत्ता हस्तगत करण्याचे मनसुबे भारतीय जनता पार्टी रचत आहे. त्यासाठी भाजपाच्या मदतीला दक्षिण भारतातून येणारे एकमेव राज्य म्हणजे कर्नाटक आहे.

- वसंत भोसलेफिर एक बार, मोदी सरकार’ अशी घोषणा देत देशाची सत्ता हस्तगत करण्याचे मनसुबे भारतीय जनता पार्टी रचत आहे. त्यासाठी भाजपाच्या मदतीला दक्षिण भारतातून येणारे एकमेव राज्य म्हणजे कर्नाटक आहे. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांतील पराभवाने अस्वस्थ झालेल्या भाजापने राज्यातील सत्तारूढ काँग्रेस-जनता दल आघाडीचे सरकार पाडण्यासाठी ‘आॅपरेशन कमळ ’ राबवून पाहिले. त्यात यश न आल्याने येत्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचेच आॅपरेशन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक नऊ जागा जिंकून देणारे कर्नाटक हे देशातील एकमेव होते. भाजपाने अठ्ठावीसपैकी सतरा जागा जिंकून वर्चस्व ठेवले होते, तर कर्नाटकातील तिसरी राजकीय शक्ती म्हणून आपली निर्णायक भूमिका बजावणाऱ्या जनता दलाने दोन जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये स्वत: माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा समावेश आहे.कर्नाटक राज्य विधानसभेची निवडणूक गेल्या वर्षी झाली. त्यात काँग्रेसला बहुमत मिळविता आले नाही. भाजपाला बहुमत मिळविण्यास हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या जागा कमी पडल्या. जनता दलाने अठ्ठावीस जागा जिंकून किंगमेकरची भूमिका बजावली. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जनता दलालाच मुख्यमंत्रीपद बहाल केले. त्यामुळे राज्यात आज काँग्रेस-जनता दल आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने आघाडीचे सरकार पाडण्यासाठी वारंवार ‘आॅपरेशन कमळ’ योजना राबविली; पण मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या कुशल राजकीय डावपेचांमुळे ते शक्य झाले नाही. भाजपाला बहुमत मिळविता आले नाही, तसेच ते शाबीतही करता आले नाही. परिणामी काँग्रेस-जनता दल आघाडीला अपयशी ठरविण्याचा खटाटोप चालू ठेवला आहे. मात्र,सध्या तरी काँग्रेस आघाडीचा वरचष्मा राहणार असे वातावरण दिसत आहे. त्याचा लाभ उठविण्यासाठी अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवले तर कर्नाटक जिंकणे काँग्रेस-जनता दल आघाडीला शक्य आहे.दक्षिण कर्नाटकातील जागावाटपाची डोकेदुखीकाँग्रेस - जनता दल आघाडीने लोकसभा निवडणुका एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका भाजपला बसेल. मात्र जनता दलाचा प्रभाव असणाºया दक्षिण कर्नाटकातील १५ जागांचे वाटप करणेही डोकेदुखी ठरणार आहे. गेल्या निवडणुकीत जनता दल, भाजपा व काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली होती. दक्षिण कर्नाटकातील आठच मतदारसंघांत जनता दलाची निर्णायक ताकद आहे आणि भाजपा येथेच कमकुवत आहे.उत्तर कर्नाटकातील लढती काँग्रेस व भाजपा यांच्यातच होतील. कोकण किनारपट्टीतही तिन्ही जागांमध्ये याच पक्षांत लढत आहे. काँग्रेस-जनता दल आघाडीने एकसंधपणे लढत दिली तर दक्षिण भारतातून भाजपाला आशादायी ठरू शकणाºया कर्नाटकात फटका बसू शकतो. काँग्रेसने जनता दलाशी दगाफटका केला तर मात्र भाजपाचे पुन्हा वर्चस्व निर्माण होऊ शकते. काठावरच्या बहुमताने आघाडी सरकार टिकविण्याची जनता दलाची प्राथमिकता असल्याने भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न राहील.येडियुरप्पांना नाही केंद्रात रसकर्नाटकात भाजपचे नेतृत्व करणारे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांना केंद्र सरकारच्या राजकारणात रस नाही. त्यांना केंद्रीय मंत्रिपद बहाल केले असतानाही त्यांनी न स्वीकारता राज्यात राहणे पसंत केले होते. त्यामुळे कर्नाटकात ते ‘फिर एक बार, मोदी सरकार’ यासाठी कितपत ताकदीने उतरतील, याची शंका आहे.याउलट कर्नाटकातील सत्तांतर करण्यातच त्यांची शक्ती खर्ची पडत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘आॅपरेशन कमळ ’ यशस्वी केल्यास, काँग्रेस-जनता दल आघाडी अधिक एकरूप होऊन त्वेषाने निवडणुकीत उतरू शकेल. तसेच वातावरण सध्या असल्याने राज्यात भाजपापुढे मोठे आव्हान आहे. देशाच्या राजकारणात महत्त्वाची भागीदारी करण्यासाठी दोन्ही बाजंूनी राजकारण निर्णायक ठरणार आहे.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपा