शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

फ्लायओव्हरचा भाग कोसळल्याचा व्हायरल फोटो ना मुंबईचा, ना पुण्याचा, ना बंगळुरूचा... जाणून घ्या सत्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 08:42 IST

पडलेल्या पुलाचा एक फोटो हा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच ही घटना मुंबई, पुणे आणि बंगळुरूमध्ये घडल्याचा दावा व्हायरल मेसेजमध्ये केला जात आहे. मात्र याबाबत फॅक्टचेक केलं असता सत्य समोर आलं आहे. 

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात एखादी घटना घडली की ती अत्यंत वेगाने सर्वत्र व्हायरल होते. सध्या अशा अनेक गोष्टी, मेसेज हे पटकन व्हायरल होताना दिसत आहेत. पडलेल्या पुलाचा एक फोटो हा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच ही घटना मुंबई, पुणे आणि बंगळुरूमध्ये घडल्याचा दावा व्हायरल मेसेजमध्ये केला जात आहे. मात्र याबाबत फॅक्टचेक केलं असता सत्य समोर आलं आहे. 

फ्लायओव्हरचा भाग कोसळल्याचा व्हायरल फोटो हा मुंबईचा, पुण्याचा नाही तर गुरुग्रामचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या गुरुग्राममध्ये शनिवारी रात्री एका निर्माणाधीन फ्लायओव्हरचा काही भाग कोसळला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडली. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

सोहन रोडवर विपुल ग्रीन्सजवळ रात्री 11 च्या सुमारास ही फ्लायओव्हरचा काही भाग कोसळला. फ्लायओव्हरचं काम सुरू असून बादशाहपूर एलिवेटेड हायवेचा तो एक भाग आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. हरियाणाचे मुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. 'सोहना रोडवरील एलिवेटेड कॉरिडोरचा एक स्लॅब कोसळला, यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असल्याचं' म्हटलं होतं. 

पडलेल्या पुलाचा फोटो हा सोशल मीडियावर मुंबईचा, पुण्याचा, बंगळुरूचा म्हणून फिरत आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अशी कोणतीही घटना घडलेली नसून हा फोटो पुण्याचा नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आपल्या ट्विटर अकांटवरून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. "मेट्रोचा निर्माणाधीन पूल कोसळल्याची छायाचित्रे समाज माध्यमातून, विशेषतः WhatsApp वरुन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून ती छायाचित्रे पुण्यातील असल्याचा दावा केला गेलाय. मात्र या दाव्यात कोणतेही तथ्य नसून अशी कोणतीही घटना पुण्यात घडलेली नाही. यासंदर्भात मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी माझे बोलणे झाले असून हा प्रकार पुणे शहरातील नाही. आपल्यालाही असे फोटोज आणि मेसेज आले असल्यास आपण फॉरवर्ड करू नका!'' असं ट्विट मोहोळ यांनी केलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

"...असा पक्ष कोणालाही वाचवता येणार नाही", शिवराज सिंह चौहान यांचा हल्लाबोल

"काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधींची मुलंही योग्य उमेदवार"

"मला माझ्या मित्राची उणीव प्रकर्षाने जाणवतेय", Video शेअर करत मोदी झाले भावूक

कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचं मंगल करावं, शरद पवारांचं गणरायाला साकडं

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! ...म्हणून 'या' देशात शवपेटीत झोपू लागलेत लोक

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाMumbaiमुंबईPuneपुणेBengaluruबेंगळूर