Porn Film in Indian Oil Program: इंडियन ऑईलचा कार्यक्रम; केंद्रीय मंत्र्यांसमोर स्क्रीनवर सुरु झाली पॉर्न फिल्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 18:25 IST2022-05-03T18:24:37+5:302022-05-03T18:25:07+5:30
इंडियन ऑईलचा मिथेनॉल मिश्रीत एम १५ पेट्रोलच्या पायलट रोलआऊटचे लाँच करण्यात येत होते. एका मोठ्या हॉटेलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Porn Film in Indian Oil Program: इंडियन ऑईलचा कार्यक्रम; केंद्रीय मंत्र्यांसमोर स्क्रीनवर सुरु झाली पॉर्न फिल्म
गुवाहाटी : आसामच्या तिनसुकियामध्ये गेल्या शनिवारी धक्कादायक प्रकार घडला आहे. हॉटेल मिरानामध्ये इंडियन ऑईलच्या कार्यक्रमात स्क्रीनवर अचानक पॉर्न फिल्म सुरु झाली. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली आणि आसामचे कामगार मंत्री संचय किसान हजर होते. शेकडो लोकांसमोर हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.
इंडियन ऑईलचा मिथेनॉल मिश्रीत एम १५ पेट्रोलच्या पायलट रोलआऊटचे लाँच करण्यात येत होते. यामध्ये तेली, निती आयोगाचे सदस्य डॉ वीके सारस्वत, कंपनीचे अध्यक्ष एसएम विद्या आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंचावर मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. इंडियन ऑईलचे एक अधिकारी मंचावर आपले भाषण देत होते. स्क्रीनवर मिथेनॉल मिश्रित पेट्रोल प्रकल्पाची व्हिडिओ क्लिप दाखवली जात होती. प्रोजेक्टर ऑपरेटर व्हिडिओ क्लिप बदलत असताना अचानक प्रोजेक्टरच्या स्क्रीनवर एक अश्लील फिल्म दिसू लागली आणि उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. व्हिडिओ 3-4 सेकंद सुरु होता, ऑपरेटरने घाईघाईने तो बंद केला.
तेली म्हणाले, त्यावेळी मी इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्याचे भाषण ऐकत होतो. मी स्क्रीनकडे पाहत नव्हतो आणि मला काय घडले ते माहिती नव्हते. नंतर, माझे पीए आले आणि त्यांनी झालेला प्रकार सांगितला. प्रोजेक्टर ऑपरेटरला गुन्हे शाखेने यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. डीसीही तिथे बसले होते. मी त्यांना तत्काळ तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.