शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

पोल्लाचीमधील सेक्स स्कँडलवरून राजकारण तापले, सत्ताधारी अण्णा द्रमुक अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 05:53 IST

लोकसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर एका सेक्स स्कँडलमुळे सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्ष भलताच अडचणीत आला आहे. या पक्षाशी संबंधित एक जण या सेक्स स्कँडलमधील आरोपी असल्याचे उघड होताच, त्याची पक्षातून हकालपट्टीही करण्यात आली.

- असिफ कुरणेलोकसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर एका सेक्स स्कँडलमुळे सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्ष भलताच अडचणीत आला आहे. या पक्षाशी संबंधित एक जण या सेक्स स्कँडलमधील आरोपी असल्याचे उघड होताच, त्याची पक्षातून हकालपट्टीही करण्यात आली. तरीही सत्ताधारी बड्या नेत्याचा या स्कँडलशी संबंध असल्याचे आरोप विरोधकांनी सुरू केले आहेत. विरोधकांनी विधानसभेचे उपाध्यक्ष व्ही. जयरामन यांचे उघडपणे नावच घेतले आहे. ते पोल्लाची मतदारसंघातूनच निवडून आले आहेत. त्यांनी आरोपाचा इन्कार करून आरोप करणारे द्रमुकचे सर्वेसर्वा स्टॅलिन यांच्या जावयावर खटलाही दाखल केला आहे. त्याचा निकाल काहीही लागो, पण अण्णा द्रमुक व सरकार यांची या प्रकरणामुळे अडचण मात्र झाली आहे.कोइम्बतूर जिल्ह्यातील पोल्लाची शहरातील एका टोळक्याने ५०हून अधिक महिला, मुलींचा लैंगिक छळ केल्याचे प्रकरण ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात उघड झाल्याने सत्ताधारी अण्णा द्रमुक अडचणीत आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींना अण्णा द्रमुकच्या नेत्याची साथ होती, असा आरोप द्रमुकसह विरोधी पक्षांनी केला आहे.पोल्लाची प्रकरण चिघळण्याची लक्षणे दिसताच, अण्णा द्रमुकने एका नेत्याची पक्षातून हकालपट्टी केली. आरोपींचे सत्ताधारी अण्णा द्रमुकमधील वरिष्ठ राजकीय नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर विरोधक अधिकच आक्रमक झाले आहेत. सरकारने संतप्त लोकभावना लक्षात घेत, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे. मात्र, या प्रकरणात निवडणुकीत मोठा परिणाम होऊ शकेल. फेब्रुवारीमध्ये एका तरुणीने आपणास ब्लॅकमेल करून लैंगिक छळ केल्याची तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघड झाले. पोलिसांनी तिरूवरूकुरासू (वय २६ ), सतीश (२९ ), सबरीराजन (२७) व वसंतकुमार (२६) या चौघांना अटक केली. त्यातील तिघांना जामीन मिळाला आहे. पोलिसांना संशयित आरोपींच्या मोबाइलमध्ये ५०हून जास्त महिला व युवतींचे आक्षेपार्ह व्हिडीओ व छायाचित्रे सापडल्याचे उघड झाले आहे. डॉक्टर, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, शिक्षिकांवर केलेल्या अत्याचाराच्या व्हिडीओंचा समावेश आहे.तामिळनाडूच्या राजकीय, सामाजिक राजकारणात हे प्रकरण उग्र रूप घेऊ लागले आहे. तक्रारदार तरुणीच्या भावाला धमकावल्याबद्दल अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना सत्ताधारी पाठीशी घालत असल्याचा आरोप करून, द्रमुकने सत्ताधाऱ्यांच्या अडचणीत वाढविल्या आहेत. आरोपींविरोधात ठिकठिकाणी तीव्र आंदोलन सुरू असून, त्याला द्रमुक नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. एम. के. स्टॅलिन, कणिमोळी यांनी प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे, तसेच सरकारने दोषींविरोधात कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्टॅलिन व वायको यांनी दिला आहे.काय आहे प्रकरण?पोल्लाची शहरातील तिरूवरूकुरासु, सतीश, सबरीरजन, वसंतकुमार हे फेसबुकवर महिलांच्या नावाने अकाउंट काढून महिला, युवतींशी संपर्क साधत. बहुतांश प्रकरणात ते त्यांच्याशी सेक्सविषयी चॅट करत.फेसबूकवर मैत्री झाल्यानंतर हे टोळके त्यांचा मोबाइल नंबर घेत असे आणि त्यावर महिला, युवतींसोबत कामोत्तेजक गप्पा करे. नंतर खरी ओळख सांगून हे संभाषण व्हायरल करण्याची धमकी देत भेटायला बोलवित. महिला, मुली जाताच, त्यांचा लैंगिक छळ करून त्याचे व्हिडीओ बनवित. या टोळक्याने सात वर्षांत २५० पेक्षाहून अधिक महिलांचे शोषण केल्याचा आरोप आहे.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण