politics will be done on surgical strike to divert attention from real issues - Akhilesh Singh, Congress leader | निवडणुका आल्या की सर्जिकल स्ट्राइक करायची हा तर मोदी सरकारचा पॅटर्न, कॉग्रेस नेत्याची टीका
निवडणुका आल्या की सर्जिकल स्ट्राइक करायची हा तर मोदी सरकारचा पॅटर्न, कॉग्रेस नेत्याची टीका

नवी दिल्ली - पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मोठी करवाई करत भारतीय लष्कराने आज 22 दहशतवाद्यांसह 11 पाकिस्तानी जवानांना कंठस्नान घातले. दरम्यान, लष्कराच्या या कारवाईनंतर आता राजकारणासही सुरुवात झाली आहे. एकीकडे भाजपाने या कारवाईचे स्वागत केले आहे, तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांकडून या कारवाईवर उपहासात्मक टीका करण्यात आळी आहे. ''कुठल्याही मोठ्या राज्यात निवडणूक असली की सर्जिकल स्ट्राइक करायची हा मोदी सरकारने पॅटर्नच बनवला आहे. आता खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सर्जिकल स्ट्राइकवरराजकारण केले जाईल,'' असा टोला काँग्रेस नेते अखिलेश सिंह यांनी लगावला आहे.  आज सकाळी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील तांगधर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून लष्करी चौक्या आणि गावांना लक्ष्य करून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तांगधर सेक्टरमध्ये तैनात असलेले दोन जवान शहीद झाले होते. पाकिस्तानच्या या नापाक कृत्यानंतर भारतीय लष्कराने प्रत्युत्तरा दाखल मोठी कारवाई केली आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये तोफांचा मारा करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत.  

यावेळी जवानांनी दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले. तसेच, उखळी तोफांचा मारा केला. यात दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईमुळे दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने मोठा दणका दिला आहे. या कारवाईत कारवाईत 11 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. तर 22 हून अधिक दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले आहे. 

दरम्यान, भारतीय लष्काराच्या कारवाईनंतर केंद्र सरकार अलर्टवर असून संरक्षण मंत्रालय सुद्धा याकडे लक्ष ठेवून आहे. या कारवाई संदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्याशी संपर्क साधून माहिती घेत आहेत.  


Web Title: politics will be done on surgical strike to divert attention from real issues - Akhilesh Singh, Congress leader
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.