शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 18:01 IST

वारंवार उघड पडूनही, ते निर्लज्जपणे खोटेपणा पसरवत आहे. बिहारमध्ये त्यांचा पराभव निश्चित आहे. यामुळेच ते असे करत आहेत.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या एका लेखाने देशातील राजकारण जबरदस्त तापले आहे. राहुल गांधी यांचा हा लेख एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे. या लेखात राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गडबड-गोंधळ झाल्याचा आरोप केला आहे. 'निवडणुकीत गडबड-गोंधळ करून भाजपला फायदा झाला,' असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या लेखावर निशाणा साधत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, राहुल गांधी यांचा नवा लेख म्हणजे एकामागून एक निवडणूक हरल्याचे त्यांचे दुःख आणि निराशेमुळे, बनावट नरेटिव्ह सेट करण्याची ब्लूप्रिंट आहे.

एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये जेपी नड्डा म्हणाले, "राहुल गांधी यांचा नवा लेख, एकापाठोपाठ एक निवडणूक हारल्याचे त्यांचे दुःख आणि निराशेमुळे, बनावट नरेटिव्ह सेट करण्याची ब्लूप्रिंट आहे.'

नड्डा पुढे म्हणाले, 'ते' हे सर्व स्टेप बाय स्टेप करतात. स्टेप 1: त्यांच्या कृत्यामुळे काँग्रेसला प्रत्येक निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागते.स्टेप 2: आत्मपरीक्षण करण्याऐवजी, ते विचित्र कट कारस्तान रचत असतात आणि फसवणुकीचा आरोप करतात.स्टेप 3: सर्व तथ्ये आणि आकडेवारी कडे दुर्लक्ष करतात.स्टेप 4: कुठल्याही पुराव्याशिवाय संस्थांची बदनामी करतात.स्टेप 5: त्यांना तथ्यांपेक्षा अधिक बातमीत राहण्याची आशा असते.

वारंवार उघड पडूनही, ते निर्लज्जपणे खोटेपणा पसरवत आहे. बिहारमध्ये त्यांचा पराभव निश्चित आहे. यामुळेच ते असे करत आहेत. लोकशाहीला नाटकाची गरज नाही. तिला सत्याची आवश्यकता आहे," असेही नड्डा यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींच्या आक्षेपांवर काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? -जोवर राहुल गांधी सत्य स्वीकारणार नाहीत, जोवर ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत, तोवर त्यांच्या पक्षाला कुठलेही भवितव्य उरलेले नाही. मला वाटते, स्वतःशीच खोटे बोलून, स्वत:ला दिलासा देण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहि‍णींचा अपमान राहुल गांधी करत आहेत. त्यांनी जागे झाले पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

दरम्यान, रोज खोटे बोलले की लोकांना ते खरे वाटते, असे राहुल गांधींना वाटत आहे. त्यामुळेच त्याच त्या गोष्टी राहुल गांधी सातत्याने बोलतात. हा आरोप यापूर्वी त्यांनी केला होता. निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकांत किती मतदार वाढले होते, या निवडणूकीत किती वाढले हे सगळे सप्रमाण दिले. पण रोज खोटे बोलायचे ही सवय राहुल गांधी यांना लागली आहे. कारण ते स्वत:च्या मनाला समजावत आहेत, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या आक्षेपांवर प्रत्युत्तर दिले. 

टॅग्स :j. p. naddaजे. पी. नड्डाRahul Gandhiराहुल गांधीMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024BJPभाजपाcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस