शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात जातीय जनगणना अहवाल लीक होताच राजकारण तापलं, काँग्रेसमध्येच निर्माण झाला वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 20:08 IST

हा अहवाल पूर्णपणे अवैज्ञानिक आणि अवास्तव असल्याचे म्हणत, सरकारने तो ताबडतोब रद्द करावा, अशी मागणी काँग्रेसच्याच काही नेत्यांनी केली आहे. मुस्लीम समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करण्यात आला आहे. मात्र या शिफारशींसंदर्भात इतर समाजातच नाराजी वाढली आहे.

जातीय जनगणनेच्या अहवालावरून कर्नाटकातील राजकारण चांगलेच तापले आहे. नुकत्याच लीक झालेल्या अहवालावरून काँग्रेसमध्येच धुसफूस सुरू झाली आहे. या अहवालात ओबीसींचे आरक्षण ३२% वरून ५१% तर मुस्लिमांना देण्यात आलेले आरक्षण ४% वरून ८% करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या अहवालामुळे कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसमध्येच वाद निर्माण झाला आहे. 

हा अहवाल पूर्णपणे अवैज्ञानिक आणि अवास्तव असल्याचे म्हणत, सरकारने तो ताबडतोब रद्द करावा, अशी मागणी काँग्रेसच्याच काही नेत्यांनी केली आहे. मुस्लीम समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करण्यात आला आहे. मात्र या शिफारशींसंदर्भात इतर समाजातच नाराजी वाढली आहे.

१७ एप्रिलला विशेष मंत्रिमंडळ बैठक -मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या अहवालावर चर्चा करण्यासाठी १७ एप्रिल रोजी विशेष मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीपूर्वीच वाद निर्माण झाला आहे. हा अहवाल शुक्रवारीच सरकारला सादर करण्यात आला होता. यानंतर ,  त्याची प्रत रविवारी सर्व मंत्र्यांना पाठवण्यात आली होती.

काय म्हणाले सिद्धरामय्या... -कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या सोमवारी म्हणाले, १७ एप्रिल रोजी बोलावण्यात आलेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्यानंतरच आपण जातीय जनगणना अहवालावर भाष्य करू. त्यापूर्वी आपण या विषयावर काहीही बोलणार नाही. आम्ही या एकमेव विषयावर चर्चा करण्यासाठी १७ एप्रिल रोजी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. चर्चेनंतर मी (या विषयावर) बोलेन.

आरक्षणाची मर्यादा वाढून ७३.५% होऊ शकते -या अहवालानुसार, अनुसूचित जातींसाठी १५% आरक्षण, अनुसूचित जमातींसाठी ७.५% आरक्षण आणि इतर प्रवर्गांचे आरक्षण मिळून एकूण आरक्षण ७३.५ होऊ शकते. जे सध्या राज्यात ५०% आहे. हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे.

 

टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेसreservationआरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीMuslimमुस्लीम