शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पुनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

राजकीय पक्ष गुंतले डॅमेज कंट्रोलमध्ये, आपापले घर वाचविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 4:07 AM

गुजरातेत सध्या सर्वत्र एकच धूम आहे आणि ती म्हणजे काँग्रेस, भाजप आपल्याच नाराज नेत्यांचे मन वळविण्यात गुंतलेले आहेत. असंतुष्टांचे काय करायचे, याचीच त्यांच्यासमोर खरी समस्या आहे.

महेश खरे सुरत : गुजरातेत सध्या सर्वत्र एकच धूम आहे आणि ती म्हणजे काँग्रेस, भाजप आपल्याच नाराज नेत्यांचे मन वळविण्यात गुंतलेले आहेत. असंतुष्टांचे काय करायचे, याचीच त्यांच्यासमोर खरी समस्या आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्प्यात ८९ जागांवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर आहे. याच काळात राजकीय पक्षांचे असंतुष्ट नेते उमेदवारी अर्ज दाखल करून मैदानात उतरलेले आहेत. दक्षिण गुजरातबाबत बोलायचे झाले, तर काँग्रेस व भाजपचे ५० पेक्षा अधिक बंडखोर नेते डोकेदुखी बनले आहेत. त्यांनी आपले अर्ज परत घेतले नाहीत, तर ते निवडणूक निकालांवरही परिणाम करतील.मॅरेथॉन बैठकांचे सत्रबडे नेते व उमेदवार असंतुष्टांबरोबर मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न करीत आहेत. कामरेज मतदारसंघात काँग्रेसने नीलशभाई कुंभाणी यांचे मन वळवले व त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. मजुरा भागात काँग्रेस उमेदवार अशोक कोठारी हे कपडा व्यापारी आहेत; परंतु कपडा बाजारात त्यांच्याविरुद्ध नाराजी आहे. त्यामुळे कोठारी व त्यांचे समर्थक व्यापाºयांची मनधरणी करण्यात गुंतलेले आहेत.भाजपमध्ये अनेक बडे नेते नाराजभाजपने तिकीट नाकारल्यामुळे अनेक बडे नेते नाराज झाले आहेत. एक तर ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत किंवा नाराज होऊन कोपभवनात जाऊन बसलेले आहेत. या निवडणुकीत आयाराम-गयारामांचीही चलती आहे. पाटीदार मतांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही पक्ष सक्रिय आहेत. पाटीदार नेता हार्दिक पटेलने आरक्षणाच्या काँग्रेसच्या फॉर्म्युल्याला मंजुरी दिली. यामुळे काँग्रेसच्या गटात आनंदाचे वातावरण आहे व भाजपने पाटीदार मतांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न गतिमान केले आहेत.

टॅग्स :BJPभाजपाGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017GujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदीhardik patelहार्दिक पटेलAmit Shahअमित शाहRahul Gandhiराहुल गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस