शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानात पुन्हा वादळ?; गेहलोत यांचे १५ आमदार संपर्कात असल्याच्या पायलट गटाच्या दाव्यानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 20:40 IST

गेहलोत गटाचे १० ते १५ आमदार संपर्कात असल्याचा दावा; राजकीय वर्तुळात खळबळ

जयपूर: राजस्थानमध्ये सुरू असलेला सत्ता संघर्ष सुरूच आहे. काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता न्यायालयात पोहोचला आहे. याशिवाय काँग्रेस विरुद्ध राज्यपाल कलराज मिश्रा यांच्यातही वाद पेटला आहे. यानंतर आता सचिन पायलट यांचा गट पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसत आहे. गेहलोत गटाचे १५ आमदार संपर्कात असल्याचा दावा पायलट गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सचिन पायलट गटात असलेले काँग्रेसचे वरिष्ठ आमदार हेमाराम चौधनी यांच्या दाव्यानं सध्या खळबळ माजली आहे. गेहलोत गटाचे १० ते १५ आमदार संपर्कात असल्याचा दावा पायलट गटाकडून करण्यात आला आहे. त्याआधी काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेत वरिष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी पायलट यांच्यासोबत असलेले ३ आमदार संपर्कात असल्याचा दावा केला. हे आमदार लवकरच आमच्यासोबत येतील, असंही सुरजेवाला म्हणाले.सुरजेवालांनी ३ बंडखोर आमदार संपर्कात असल्याचा दावा करताच पायलट गटाकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला. या व्हिडीओच्या माध्यमातून पायलट यांच्या गटातील वरिष्ठ आमदार असलेल्या आमदार हेमाराम चौधरींनी गेहलोत गटाचे १० ते १५ आमदार संपर्कात असल्याचा दावा केला. गेहलोत यांनी आमदारांना एकाच जागी ठेवलं आहे. गेहलोत यांनी आमदारांवर लादलेले निर्बंध हटवून त्यांना मोकळं करावं. मग त्यांच्यासोबत किती आमदार आहेत, हे त्यांना समजले, अशा शब्दांत चौधरींनी थेट गेहलोत यांना आव्हान दिलं.राजस्थानातला राजकीय संघर्ष सुरुच आहे. राज्यपालांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना गेहलोत सरकारकडून शनिवारी रात्री उत्तरं देण्यात आली. सरकारनं विधानसभेचं अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. त्यासाठीचा प्रस्तावदेखील राज्यपालांना देण्यात आला. मात्र अद्याप तरी अधिवेशनाची तारीख निश्चित झालेली नाही. त्यामुळे राजकीय घडामोडी सुरूच आहेत. 

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलटRajasthanराजस्थानcongressकाँग्रेस