शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

एक राजकीय मुत्सद्दी !

By admin | Updated: December 25, 2014 02:13 IST

एक राजकीय मुत्सद्दी नेते, एक निष्णात वाक्पटू, एक संवेदनशील कवी अशी अटल बिहारी वाजपेयी यांची ओळख आहे़ काँग्रेसवगळता अन्य पक्षांचे

एक राजकीय मुत्सद्दी नेते, एक निष्णात वाक्पटू, एक संवेदनशील कवी अशी अटल बिहारी वाजपेयी यांची ओळख आहे़ काँग्रेसवगळता अन्य पक्षांचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले वाजपेयी भाजपाचा मवाळ चेहरा म्हणून सर्वपरिचित होते़ ९०च्या दशकात राजकारणाच्या मंचावर भाजपाला नवी ओळख देण्यात वाजपेयींचे मोठे योगदान आहे़ओघवती वाणी आणि खंबीर नेतृत्व या जोरावर वाजपेयींची पंतप्रधानपदाची कारकीर्द गाजली़ भारत-पाकिस्तान यांच्यातील मतभेद दूर करण्याच्या दिशेने त्यांनी या काळात ठोस पावले उचलली़ याच प्रयत्नांनी त्यांना जागतिक पातळीवर नवी ओळख मिळवून दिली़ १९९९ मध्ये वाजपेयींनी पाकिस्तान दौरा केला़ त्यांच्याच पक्षाच्या कट्टरवादी नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली़ मात्र राजनैतिक रूपात, भारत-पाक संबंधातील नवे युग म्हणून याकडे पाहिले गेले़ मात्र त्यांच्याच काळात कारगील युद्ध घडले़ या युद्धात पाकिस्तानला पराभवाचे तोंड पाहावे लागले़१९५१ मध्ये जनसंघाची स्थापना झाली़ यादरम्यान डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा उत्तर प्रदेश दौरा होता़ पत्रकार म्हणून वाजपेयी या दौऱ्यात त्यांच्यासोबत होते़ मुखर्जींना काही कारणास्तव वेळ होता म्हणून लोकांना खिळवून ठेवण्याची जबाबदारी अचानक वाजपेयींवर सोपवली गेली़ या वेळी वाजपेयींच्या वाणीने सर्वच मंत्रमुग्ध झाले़ काश्मीर आंदोलनाच्या वेळी ते मुखर्जींचे खासगी सचिव बनले आणि राजकारणात त्यांचा प्रवेश झाला़आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील जनता पार्टी जनसंघाचे विलीनीकरण झाले़ यानंतरच्या १९७७ च्या निवडणुकीनंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले़ त्यांच्या मंत्रिमंडळात वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले़ या काळात संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीतून भाषण करणारे ते पहिले नेते ठरले़ मोरारजींनी राजीनामा दिल्यानंतर जनसंघ पुन्हा वेगळा झाला आणि १९८० मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली़ १९९६ च्या निवडणुकीत भाजपा तरला आणि वाजपेयी पंतप्रधान झाले़ मात्र हे सरकार उणेपुरे १३ दिवसांचे ठरले़ १३ महिन्यांनंतर १९९९ च्या प्रारंभी त्यांच्या नेतृत्वात बनलेले दुसरे सरकारही कोसळले़ त्यानंतरच्या निवडणुकीत अनेक मित्रपक्षांच्या साथीने भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आले आणि वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले़