शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरात जाण्यापासून पोलिसांनी रोखले, माझी चूक काय?, राहुल गांधींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 11:23 IST

येथील मंदिरात राहुल गांधींना जाऊ दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

- अयोध्येत आज प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक परंपरेसह साजरा होत आहे. त्यासाठी, लाखो भाविक अयोध्या नगरीत जमले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते ही प्राणप्रतिष्ठा होत आहे. देशभरात मोठा उत्साह अन् आनंदाचे वातावरण आहे. अयोध्येत सर्वसामान्य नागरिकांसह नेते, सेलिब्रिटी आणि दिग्गजांची उपस्थिती आहे. दुसरीकडे काँग्रेसने या सोहळ्याला येणार नसल्याचे म्हटले आहे. तर, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. यावेळी, आसाममधील नगाव जिल्ह्यात त्यांची यात्रा पोहोचली आहे. मात्र, येथील मंदिरात राहुल गांधींना जाऊ दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

नगाव जिल्ह्यात आसामचे वैष्णव संत शंकरदेव यांचे जन्मस्थान आहे. त्यामुळे, राहुल गांधी आज वैष्णव संत शंकरदेव यांचे जन्मस्थळ असलेल्या बर्दोवा येथे जाणार होते. राहुल गांधींना येथील मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. मी येथेच आहे, फक्त हात जोडण्यासाठी मंदिरात जात आहे. मात्र, प्रशासनाने मला मंदिरात जाण्यापासून रोखले, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. 

मंदिरात जात असलेल्या राहुल गांधींची पोलीस प्रशासनासोबत शाब्दीक वादावादी झाली. त्यानंतर, आज फक्त एकाच माणसाला मंदिरात जाण्याची परवानगी आहे, असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. दुपारी ३ नंतर तुम्ही मंदिरात जाऊ शकता, असे पोलीस प्रशासनाने राहुल गांधींना सांगितले आहे. 

राहुल गांधींना बर्दोवा पोलीस ठाण्याकडून मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे, मला मंदिरात का जाऊ दिलं जात नाही, माझी काय चूक आहे?, असा प्रश्न राहुल गांधींनी प्रशासनला केला. तसेच, पोलिसांनी ज्याजागी बॅरिकेड्स लावले, तेथेच त्यांनी ठिय्या मांडल्याचेही पाहायला मिळाले. दरम्यान, स्थानिक खासदार आणि आमदारांना शंकरदेव मठात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून अडवल्यामुळे काँग्रेस समर्थकांनी प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAyodhyaअयोध्याagitationआंदोलनcongressकाँग्रेसPoliceपोलिस