शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
2
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
3
डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 
4
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
5
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
6
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
7
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
8
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
9
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
10
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
11
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
12
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
13
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
14
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
15
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
16
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
17
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
18
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
19
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
20
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 02:18 IST

कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल मंत्री विजय शाह यांच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल केलेल्या एफआयआरवर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

जबलपूर: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल केलेल्या एफआयआरवर उच्च न्यायालयाने गुरुवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती अतुल श्रीधरन आणि अनुराधा शुक्ला यांच्या खंडपीठाने म्हटले की, हा एफआयआर केवळ औपचारिकता आहे. आमच्यासमोर ठेवण्यात आलेल्या एफआयआरला आव्हान दिल्यास तो सहज रद्द केला जाऊ शकतो, इतका तो तकलादू आहे.

आता न्यायालय या पोलिस तपासावर देखरेख करेल. कोणत्याही दबावामुळे तपासावर परिणाम होऊ नये म्हणून हे करणे आवश्यक आहे. पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा, असेही खंडपीठाने नमूद केले. (वृत्तसंस्था)

सर्वोच्च न्यायालयानेही मंत्री शाह यांना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयानेही गुरुवारी मंत्री विजय शाह यांना चांगलेच फटकारले. जेव्हा देशात ‘युद्धजन्य परिस्थिती’ असते तेव्हा मंत्र्यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द जबाबदारीने उद्गारलेला असावा, असा सल्ला सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिला. न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांचा समावेश असलेले खंडपीठ शुक्रवारी शाह यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. एफआयआर नोंदविण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला शाह यांनी आव्हान दिले.

...आता व्योमिका सिंह यांची जात काढली

मुरादाबाद : आता विंग कमांडर व्योमिका सिंह  यांच्याबद्दल सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे काका रामगोपाल यादव यांनी वादग्रस्त टिप्पणी केली आहे. व्योमिका यांची जात रामगोपाल यांनी नमूद केली. गुरुवारी उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये ते म्हणाले, विंग कमांडर व्योमिका सिंग ही हरियाणाची जाटव आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये कारवाई करणारे एअर मार्शल अवधेश कुमार भारती यादव हे आहेत. एक मुस्लिम, दुसरा जाटव आणि तिसरा यादव. हे युद्ध फक्त पीडीए (मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्याक) नेच लढले. भाजप कोणत्या आधारावर श्रेय घेत आहे?

मंत्र्यांना काढा, सोफियांच्या काकाची मागणी : कर्नल सोफियांचे काका आणि चुलत भाऊ यांनी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांकडे मंत्री शाह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMadhya Pradeshमध्य प्रदेश