पिंपळगाव येथे पोलीस कर्मचारी कमतरता
By Admin | Updated: March 21, 2015 00:23 IST2015-03-20T22:39:34+5:302015-03-21T00:23:22+5:30
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यास वाढीव कर्मचारी मंजुरी होऊनही आतापर्यंत पोलीस ठाण्यास पोलीस कर्मचारी नियुक्त झाले नाहीत.

पिंपळगाव येथे पोलीस कर्मचारी कमतरता
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यास वाढीव कर्मचारी मंजुरी होऊनही आतापर्यंत पोलीस ठाण्यास पोलीस कर्मचारी नियुक्त झाले नाहीत.
पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे अंतर्गत सुमारे २९ गावे असुन दोन ते अडीच लाख लोकसंख्या असलेल्या या पोलीस ठाण्याला केवळ ४० पोलीस कर्मचारी व दोन अधिकारी काम करत आहे. कुठल्याही शासकीय कामनिमित्त १० ते १५ कर्मचारी बाहेरच असतात. नोटीस बजावणे, बंदोबस्त तपास निमित्ताने अनेक कर्मचारी बाहेर असतात. १० ते १५ कर्मचारी वर्ग व अधिकारी २९ गावांचे कसे संरक्षण करतील शासनाने पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याला वाढीव २० कर्मचारी मंजुरी केली आहे. मात्र आत्तापर्यंत पिंपळगाव पोलीस ठाण्याला पोलीस कर्मचारी वर्गाची नेमणूक होऊ शकली नाही. कर्मचारी वर्ग तर २४ तास काम केल्याने प्रकृती ठासळ्याल्याच्या घटनाही झडल्या आहे. पोलीस अधिकारी वर्ग नाही यामुळे शारीरिक व मानसिक ताण सहन करावा लागत आहे. या पोलीस ठाण्याला वाढीव कर्मचारी मिळाल्यास कामाचा ताण कमी होईल शासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन वाढीव कर्मचारी वर्गाच्या नेमणूका करण्याची मागणी पिंपळगावचे माजी सरपंच भास्करराव बनकर यांनी केली आहे. (वार्ताहर)