काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात पोलीस जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 05:44 IST2019-07-15T05:44:33+5:302019-07-15T05:44:42+5:30

काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी रविवारी केलेल्या एका माजी न्यायमूर्तींवर केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला.

A police jawan martyr in a terrorist attack in Kashmir | काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात पोलीस जवान शहीद

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात पोलीस जवान शहीद

श्रीनगर : काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी रविवारी केलेल्या एका माजी न्यायमूर्तींवर केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, रियाझ अहमद असे शहीद पोलिसाचे नाव आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या रियाझला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याने अखेरचा श्वास घेतला. या दहशतवादी हल्ल्याचा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी निषेध केला आहे. माजी न्यायाधीश सईद तकीर यांचा सुरक्षा रक्षक म्हणून रियाझची नेमणूक करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वीच राजकारणात प्रवेश केलेल्या तकीर यांंच्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ते बचावले मात्र त्यांचा सुरक्षेसाठी नेमलेला पोलीस शहीद झाला. 

Web Title: A police jawan martyr in a terrorist attack in Kashmir