शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

सायबर क्राइम रोखण्यासाठी पोलिसांचा पुढाकार पोलीस अधीक्षकांनी घेतली इंटरनेट कॅफे चालकांची बैठक

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

अकोला: व्हॉट्स ॲप, फेसबुकच्या माध्यमातून सायबर क्राइम घडविण्याचे प्रकार अनेकदा घडतात. फेसबुक, व्हॉट्स ॲपद्वारे अश्लील चित्रफिती, देवी-देवतांचे विटंबनात्मक छायाचित्रे व मजकूर टाकून समाजामध्ये तेढ निर्माण केली जाते. इंटरनेटच्या माध्यमातून घडणारा सायबर क्राइम रोखण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी दुपारी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी शहरातील इंटरनेट कॅफे चालकांची बैठक घेऊन त्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या.

अकोला: व्हॉट्स ॲप, फेसबुकच्या माध्यमातून सायबर क्राइम घडविण्याचे प्रकार अनेकदा घडतात. फेसबुक, व्हॉट्स ॲपद्वारे अश्लील चित्रफिती, देवी-देवतांचे विटंबनात्मक छायाचित्रे व मजकूर टाकून समाजामध्ये तेढ निर्माण केली जाते. इंटरनेटच्या माध्यमातून घडणारा सायबर क्राइम रोखण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी दुपारी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी शहरातील इंटरनेट कॅफे चालकांची बैठक घेऊन त्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या.
शहरामध्ये सातत्याने सायबर क्राइमचे गुन्हे उघडकीस येत आहेत. सायबर क्राइमच्या माध्यमातून समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासोबतच, इंटरनेट बँकिंगद्वारे आर्थिक फसवणूक, अश्लील चित्रफिती व मजकुराच्या माध्यमातून बदनामी करण्याचे प्रकार वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी दहशतवादविरोधी कक्षाच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी इंटरनेट कॅफे चालकांची बैठक घेऊन त्यांना कॅफेसाठी लागणारे परवाने कोणते, काय दक्षता घेतली पाहिजे. तसेच सायबर कॅफेमध्ये ग्राहकांकडून फोटो आयडी प्रूफची प्रत ठेवावी आणि कॅफे चालकाने ग्राहकांबाबत रजिस्टरमध्ये नोंदी ठेवाव्यात. कॅफेमध्ये आय कॅफे या सॉफ्टवेअरचा उपयोग करावा. सीसी कॅमेरे लावून खबरदारी घ्यावी. अशा सूचना केल्या. तसेच संशयित व आक्षेपार्ह आढळून आल्यास तातडीने पोलिसांना माहिती कळविण्यास पोलीस अधीक्षकांनी सांगितले. (प्रतिनिधी)
00000000000000000000