शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

यूपी पोलिसांनी 24 तासात केले चार मोठे एनकाऊंटर, अनेक गुन्हेगार अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 11:32 IST

उत्तर प्रदेशात वाढणाऱ्या गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी गुन्हेगारांविरोधात पोलीस आणि एसटीएफच्या संयुक्त पथकाने एनकाऊंटर जारी केलं आहे

लखनऊ- उत्तर प्रदेशात वाढणाऱ्या गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी गुन्हेगारांविरोधात पोलीस आणि एसटीएफच्या संयुक्त पथकाने एनकाऊंटर जारी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईत अनेक अट्टल गुन्हेगारांना पकडण्यात यश आलं आहे. मुझफ्फरनगर, नोएडा आणि मेरठमध्ये शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या कारवाईनंतर संध्याकाळी उशिरा कनोजमध्ये पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये झटापट झाली. यामध्ये एक गुन्हेगार जखमी झाल्याचं वृत्त आहे. दोन दिवसाआधी कनोजमध्यो पोलिसांनी 60 लाख बॅटरी आणि एक ट्रकसह 10 जणांना पकडलं होतं. चित्रकूटमध्येही कारवाई झाल्याची माहिती आहे. 

याआधी उत्तर प्रदेश पोलीस आणि एसटीएफच्या पथकाने बक्षिस असलेला कॉन्ट्रॅक्ट किलर इंद्रपालला मुझफ्फरनगर एनकाऊंटरमध्ये मारलं होतं. यूपी पोलिसांनी ट्विटरवरून यांसदर्भातील माहिती दिली. गोळीबार सुरू असताना इंद्रपालला गोळी लागली. या गोळीबारादरम्यान एसटीएफचे एसआयही जखमी झाले होते. इंद्रपालवर हत्या आणि दरोड्याच्या तीन डझन केसेसे दाखल असल्याचं समोर आलं. मेरठमध्ये 10 हजार रूपये बक्षिस असणाऱ्या फकरूद्दीन यालाही पोलिसांनी पकडलं. चकमकीत जखमी झालेल्या फकरूद्दीनला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. फकरूद्दीनवर अवैध हत्यार बनविण्याचा आरोप आहे. नोएडाच्या टीपीनगर भागातून पोलिसांनी दोन गुन्हेगारांना अटक केली. या दोघांनी चोरलेल्या कार, लॅपटॉप, मोबाइल फोन, काडतूसं पोलिसांनी जप्त केली. अंकित शर्मा आणि राहुल अशी या दोघांची नावं असून या दोघांवर दहा-दहा हजरा रूपयांचं बक्षिस होतं. 

कायदा सुव्यवस्था सुधारण्याचे आदेश

उत्तर प्रदेशात भाजपा सत्तेत आल्यानंतर तेथिल कायदा व सुव्यवस्था सुधारण्याचे आदोश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना दिले होते. त्यानंतर पोलिसांकडून एनकाऊंटर सुरू करण्यात आलं. गुन्हेगारांवर भारी पडच एनकाऊंटर करण्यात पश्चिम उत्तर प्रदेश पोलीस नंबर वनवर होती. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिसCrimeगुन्हा